आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या ‘झ्विगॅटो’चा ट्रेलर रिलीज:डिलिव्हरी बॉयची साकारली भूमिका, 17 मार्च रोजी रिलीज होणार चित्रपट

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी ‘झ्विगॅटो’ या चित्रपटामुळे कपिल सध्या चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटात कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातील त्याचा लूक आधीच रिलीज करण्यात आला होता. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

कपिल शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ट्रेलर रिलीज केला आहे. 'टिंग टाँग.. तुमचा ‘झ्विगॅटो’चा ट्रेलर डिलिव्हर झाला आहे. कृपया रेटिंग द्यायला विसरु नका,' असे कॅप्शन कपिल शर्माने व्हिडिओला दिले आहे

या चित्रपटात कपिल शर्मा एका सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री शहाना गोस्वामी कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका वठवली आहे. 'मजबूर है इसी लिये मजदूर है...' हा कपिल शर्माचा या ट्रेलरमधील डायलॉग खूप काही सांगून जातो. ट्रेलरमध्ये कपिल शर्माच्या कुटुंबाची झलकही दाखवण्यात आली आहे. आपल्या कुटुंबाच्या गरजांसाठी सर्वसामान्य व्यक्ती रात्रंदिवस काम कसे करतो. हे चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.

'झ्विगॅटो'चे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे. यात कपिल शर्मासोबत अभिनेत्री शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. येत्या 17 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

बातम्या आणखी आहेत...