आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलीवूडच्या हि-मॅन म्हणजेच धर्मेंद्रचा नातू करण देओलने त्याची गर्लफ्रेंड द्रिशा सोबत साखरपुडा केला आहे. द्रिशा ही दिवंगत चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. रिपोर्ट्सनुसार, द्रिशा आणि करण खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडप्याला अनेक ठिकाणी एकत्र पाहिले आहे. परंतू या दोघांनी आपल्या नात्याची कबूली दिली नव्हती. मात्र हे दोघे आता लवकरत लग्न बंधनात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आजोबांचा प्रकृतीमुळे लग्नाच्या तयारीला केली सुरुवात
रिपोर्ट्सनुसार, दादा धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने करण आणि द्रिशाचा साखरपुडा लवकर करण्यात आला. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची तयारीही जोरात सुरू झाली आहे. बातम्यांनुसार, हे कपल लवकरच त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करणार आहे. खरं तर, धर्मेंद्र त्याच्या आगामी फॅमिली ड्रामा 'अपने 2' च्या शूटिंगदरम्यान जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
काय झाले धर्मेंद्रंना
व्हिडिओ शेअर करत धर्मेंद्र म्हणाले की, मित्रांनो माझ्यासाठी फार काही करु नका. मणक्याचा त्रास असल्यामुळे मी गेले कित्येक दिवस हा त्रास सहन करत आहे. केवळ याच कारणामुळे मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन ते चार दिवस माझ्यासाठी फार कठीण होते. पण तुम्हा सगळ्यांच्या आर्शीवादाने मी पुन्हा चांगला झालो. तुम्हा आता माझी काळजी करु नका, मी माझ्या तब्येतीची चांगली काळजी घेईल. तुम्हा सगळ्यांना माझे खुप सारे प्रेम.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.