आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकरण जोहरचा आगामी 'जुगजुग जियो' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रांची येथील लेखकाने करणवर चित्रपटाची कथा कॉपी केल्याचा आरोप केला होता. नुकतंच रांची सिव्हिल कोर्टाने या चित्रपटावरील कॉपीराइट प्रकरणी आदेश दिला आहे. व्यावसायिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे स्क्रीनिंग न्यायालयात केले जाईल.
विशाल सिंह यांनी दीड कोटींच्या नुकसान भरपाईची केली मागणी
रांचीचे लेखक विशाल सिंह यांनी करण जोहरवर आरोप केला आहे की, 'जुगजुग जियो'चा कंटेंट त्याच्या 'पन्नी रानी' या कथेसारखाच आहे. त्यांना श्रेय न देता त्यांची कथा चित्रपटात वापरण्यात आल्याचे विशाल यांचे म्हणणे आहे. त्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे, तसेच दीड कोटी रुपयांची नुकसान भरपाईही मागितली आहे.
हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कोर्टात दाखवला जाणार आहे.
हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे खास स्क्रीनिंग न्यायालयात केले जाईल. 'जुगजुग जियो'ने कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले आहे की नाही, हे न्यायमूर्ती एमसी झा चित्रपट पाहिल्यानंतर ठरवतील. दोन्ही बाजूंचा युक्तिवादही न्यायालय विचारात घेणार आहे.
पाकिस्तानी गायकाने त्याचे गाणे चोरल्याचा केला आरोप
याशिवाय पाकिस्तानी गायक अबरार-उल-हकने यानेही करण जोहरवर त्याचे गाणे चोरल्याचा आरोप करणारी पोस्ट शेअर केली आहे. अबरारने लिहिले की, "मी माझे 'नाच पंजाबन' हे गाणे कोणत्याही भारतीय चित्रपटाला विकले नाही. मी नुकसान भरपाईसाठी न्यायालयात जाण्यासाठी हक्क राखून ठेवले आहेत. करण जोहरसारख्या निर्मात्यांनी गाण्यांची कॉपी करायला नको. हे माझे 6 वे गाणे आहे. ज्याची कॉपी केली जात आहे. ज्यासाठी अजिबात परवानगी घेतली गेली नाही."
'जुगजुग जियो' 24 जूनला सिनेमागृहात होणार आहे रिलीज
अबरारचे 'नाच पंजाबन' हे गाणे 2000 मध्ये आले होते. हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते. अबरार हा एक गायक, गीतकार आणि राजकारणी देखील आहे. त्याला किंग ऑफ पाकिस्तानी पॉप ही पदवीही मिळाली आहे. राज मेहता दिग्दर्शित 'जुग जुग जियो'मध्ये वरुण-कियारा व्यतिरिक्त अनिल कपूर, नीतू कपूर, प्राजक्ता कोळी, मनीष पॉल आणि टिस्का चोप्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 24 जून 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.