आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:नेपोटिझमच्या आरोपातून स्वतःचा बचाव करण्यासाठी 'दोस्ताना 2'मध्ये आउटसाइडरला घेणार करण, 'राधे'मध्ये होणार सलमान-रणदीपची वॉशरुम फाइट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील रंजक घडामोडी...

कार्तिक आर्यनला 'दोस्तना 2'मधून काढून टाकल्यानंतर करण जोहरने चित्रपटाच्या कास्टिंगसंदर्भात खास योजना आखली आहे. रिपोर्ट्सनुसार करणने आपल्या क्रिएटिव्ह टीमची यासंदर्भात अनेकदा भेट घेतली. या काळात अक्षय कुमार, राजकुमार राव, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या नावांची चर्चा झाली. करणला मात्र अक्षय कुमारने हा चित्रपट करायला हवा आहे. याचे मोठे कारण म्हणजे अक्षय हा एक मोठा स्टार तसेच आउटसाइडर आहे. त्याला कास्ट करून, करणला त्याच्यावरील नेपोटिझमला प्रोत्साहन दिल्याचा आरोप देखील पुसून काढायचा आहे. मात्र, अक्षयने होकार न दिल्यास उर्वरित चार नावांपैकी एक नाव फायनल केले जाऊ शकते.

2. रिहर्सल विना सलमान-रणदीपने शूट केला 'राधे'मधील वॉशरूम फाईट सीक्वेन्स
सलमान खान, दिशा पाटनी आणि रणदीप हूड्डा स्टारर 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' येत्या 13 मे रोजी जगभरातील थिएटरसह 'पे-पर-व्यू' सर्व्हिस अंतर्गत झी प्लेक्समध्ये रिलीज होणार आहे. प्रभू देवा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान आणि रणदीप यांच्यात वॉशरूम फाइट सीन देखील आहे. रणदीपने याचा खुलासा केला आणि सांगितले की, "सलमान आणि माझ्यात वॉशरूम फायट सीक्वेन्स ही प्रभु सरांची कल्पना आहे आणि कोरियन अ‍ॅक्शन डायरेक्टर मियॉंग हेन्ग यांनी ऑन स्पॉट याचे दिग्दर्शन केले आहे. आम्ही त्याची रिहर्सल केली नाही."

3. हृतिक-रणबीरला पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा : राकेश रोशन

राकेश राेशन आपला मुलगा हृतिक आणि रणबीर कपूर यांना घेऊन चित्रपट बनवणार आहेत. नुकतेच त्यांनी याविषयी माहिती दिली. ते ऋषी कपूर यांचे जिवलग मित्र होते. आपल्या मुलाला आणि ऋषीच्या मुलाला एकत्र पडद्यावर पाहण्याची त्यांची इच्छा आहे. राकेश यांनी एका मुलाखतीत संागितले, 'चिंटू आणि माझे कुटुंब एकत्र सुटी साजरी करायचो ते दिवस मी कधीच विसरु शकत नाही. हृतिक-रणबीर त्यावेळी खूप लहान होते आणि खूप धमाल करायचे. आता त्या दोघांनी एकत्र चित्रपट करावा अशी माझी इच्छा आहे. सध्या तर माझ्याकडे विषय नाही. आता कृ़ष 4 देखील लांबणीवर पडला आहे. मात्र कोरोना संपताच मी चांगल्या विषयावर दोघांना एकत्र घेऊन येईन.'

4. प्रियंका माझ्यासाठी मोठी प्रेरणा : पूजा चोप्रा​​​​​​​

अभिनेत्री पूजा चोप्राने 2013 मध्ये विद्युत जामवालच्या-‘कमांडो’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने आपली आवड आणि चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवली आहे. एका विशेष मुलाखतीत तिने सांगितले, काही कलाकांरानी तिला प्रभावित केले आहे. याविषयी ती म्हणते, ‘ऐश्वर्या राय बच्चन, प्रियंका चोप्रा, लारा दत्ता, सुष्मिता सेन सर्वच प्रतिभेच्या धनी आहेत. या सर्वांनी मला जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर प्रभावित केले. आता मी ज्या जागेवर आहे तेथे पोहोचण्यात प्रियंकाची मोठी मदत झाली म्हणजे प्रियंका माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. ज्या प्रकारे आज ती यशस्वी आहे, आपले ध्येय गाठले आहे, तिच्यासारखे कोणीच आज त्या जागेवर नाही, असे मला वाटते. ही आमच्या इंडस्ट्रीसाठी अभिनमानास्पद बाब आहे.'

5. भन्साळींच्या चित्रपटातून पदार्पण करायला आवडेल : रवीना टंडन

रवीना टंडन सध्या ‘केजीएफ चॅप्टर २’मुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीसाठी ओटीटी एक चांगले प्लेटफॉर्म असल्याचे ती मानते. ती म्हणते, 'आमच्या काळातही स्त्री प्रधान चित्रपट यायचे मात्र त्यांची संख्या इतकी मोठी नसायची. आज आेटीटीवर पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या जास्त भूमिका आहेत. आजच्या काळात पदार्पण करायचे झाले तर संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातून करायला आवडेल. आज अनेक नवी आणि तरुण दिग्दर्शक आहेत, जे महिला कलाकारांसोबत चित्रपट बनवत आहेत. मी या इंडस्ट्रीचा एक भाग असल्याचा मला आनंद आहे.'

बातम्या आणखी आहेत...