आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाती आले अपयश:अनेक प्रयत्न करुनही ब्लॉकबस्टर 'मास्टर'चे हक्क खरेदी करु शकला नाही करण जोहर, 'कबीर सिंग'च्या निर्मात्यांनी मारली बाजी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाचे हक्क विकत घेण्यासाठी हिंदी चित्रपट निर्मात्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली.

विजय आणि विजय सेतुपती स्टारर 'मास्टर' हा तामिळ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. वर्ल्डवाइड या चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरु आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर हिंदीत त्याचा रिमेक झाला नाही तरच नवल. म्हणूनच या चित्रपटाचे हक्क विकत घेण्यासाठी हिंदी चित्रपट निर्मात्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. रिपोर्ट्सनुसार करण जोहरही या शर्यतीत सहभागी होता. पण 'कबीर सिंह' फेम निर्माता मुराद खेतानी यांनी यात बाजी मारली. त्यांनी मास्टरच्या निर्मात्यांकडून तब्बल सहा कोटींमध्ये हिंदी रिमेकचे हक्क विकत घेतल्याचे सांगितले जात आहे.

'कबीर सिंग'च्या निर्मात्यांनी विकत घेतले हक्क
'कबीर सिंग' चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी ‘मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, मुराद खेतानी काही आठवड्यांपूर्वी 'मास्टर' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हैदराबदला गेले होते. त्यांना चित्रपट प्रचंड आवडला आणि त्यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. त्यासाठी त्यांनी सहा कोटी रुपये दिले असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाच्या रिमेकसाठी बॉलिवूडमधील दोन कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

शुक्रवारच्या रिलीजचा ट्रेंडही बदलला
‘मास्टर’च्या निर्मात्यांनी शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंडही माेडला. बुधवार, 13 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. याचा चांगला फायदा झाला. कारण, अनेक भागांत 13 ते 15 जानेवारीदरम्यान लोहडी, मकरसंक्रांत, पोंगलसारख्या सणाचा उत्साह होता. त्यानंतर 16 जानेवारीला शनिवार व 17 ला रविवार हे दिवस आले. यामुळे चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली दिसली. तिकीट बुकिंग साइट ‘बुक माय शो’चे आशिष सक्सेना म्हणाले, ‘मास्टर’ हा चित्रपट लॉकडाऊननंतर तिकीट खिडकीवर गर्दी खेचणारा पहिला चित्रपट आहे, यात वाद नाही.

बॉलिवूडमध्येही उत्साह, राधे, सूर्यवंशीसह 83 चित्रपटांकडून आशा
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील अनेक चित्रपटगृहांचे मालक असलेले अक्षय राठी 'मास्टर’च्या यशामुळे भारावले आहेत. ते म्हणाले, ‘आता चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित करावेत, अशी मागणी निर्मात्यांकडे करण्यात आली आहे.’ विशेषत: सलमान खानने 'राधे’ हा चित्रपट ईदच्या निमित्ताने सिनेमागृहांत प्रदर्शित करावा, असा आग्रह आहे. सूर्यवंशी, 83 आणि ‘शमशेरा’च्या निर्मात्यांकडेही मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...