आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरचा आगामी चित्रपट:'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या शूटिंगला सुरुवात, एथनिक लूकमध्ये दिसली आलिया भट्ट, रणवीर सिंगसोबत शेअर करणार स्क्रिन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एथनिक रुपात दिसली आलिया

करण जोहरचा आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. करणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. फोटो शेअर करत करणने लिहिले, 'अखेर तो दिवस आला. माझ्या मनात सध्या अनेक गोष्टी सुरु आहेत, पण सर्वात पहिली गोष्ट कृतज्ञता आहे. आम्ही कथेचे पहिले वेळापत्रक सुरू करत आहेत. आपण आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या. चित्रीकरण सुरू झाले आहे.

एथनिक रुपात दिसली आलिया

व्हिडिओमध्ये आलिया एथनिक रुपात दिसत आहे. शिफॉन साडी आणि ब्लॅकलेस ब्लाउजमध्ये ती आकर्षक दिसतेय. शिवाय कपाळावर तिच्या एक टिकली देखील आहे. रणवीर अॅनिमल प्रिंटच्या अतरंगी कपड्यात दिसतोय. व्हिडिओत आलिया, करण आणि रणवीर व्यतिरिक्त, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​आणि कास्ट आणि क्रूचे अनेक सदस्य दिसत आहेत.

आलियाने देखील व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच रणवीरनेही व्हिडिओ शेअर करत रॉकी आणि रानीची अनोखी कहाणी सुरु झाली आहे असे म्हटले आहे. या प्रवासात आमच्या बरोबर चला, असेही तो म्हणतोय.

या चित्रपटाची कथा इशिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिली आहे. चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होईल. करणने 6 जुलै 2021 रोजी सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा करत "मी माझ्या आवडत्या लोकांसोबत कॅमे-या मागे काम करण्यास खूप उत्सुक आहे," असे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...