आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घराणेशाही वादाचा धसका:करण जोहरचा मामीच्या सदस्यत्वाचा राजीनामा; दीपिका पदुकोणचा समजूत घालण्याच प्रयत्न अपुरा, करण निर्णयावर ठाम   

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मामी फिल्म फेस्टिव्हलची अध्यक्षा आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने करणला समजवण्याचा प्रयत्न केला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर करण जोहरवर घराणेशाही आणि गटबाजीला प्रोत्साहन दिल्याचा सतत आरोप होतोय. या आरोपांनंतर करणने सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत केले. आता बातमी  आहे की, करणने मामी म्हणजेच मुंबई अकॅडमी ऑफ द मुविंग इमेजला आपला राजीनामा दिला आहे. करण या फिल्म फेस्टिव्हलच्या बोर्डचा सदस्य होता.

  • दिग्दर्शिका स्मृती किरण यांना मेल केला राजीनामा

करणने   आरोपांमुळे नाराज होऊन या फिल्म फेस्टिव्हलच्या संचालिका स्मृती इराणी यांना आपला राजीनामा ई-मेलद्वारे पाठविल्याचं कळतंय. दरम्यान अशीही बातमी आहे की, मामी फिल्म फेस्टिव्हलची अध्यक्षा आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने करणला समजवण्याचा प्रयत्न केला, पण करणने तिचे म्हणणे ऐकले नाही आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मामीच्या बोर्डावर विक्रमादित्य मोटवाने, सिद्धार्थ रॉय कपूर, दीपिका पदुकोण, जोया अख्तर आणि कबीर खान यांचा समावेश आहे.

  • करण बॉलिवूड सेलेब्सवर रागावला आहे? 

रिपोर्टनुसार, करण जोहर  बॉलिवूडच्या कलाकारांवर नाराज आहे. कारण या कठीण काळात कोणीही त्याच्या बाजुने उभे राहिले नाही. त्याला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे. पण कुणीही त्याच्या बचावासाठी पुढे सरसावला नाही.

  • स्वत:ला लो प्रोफाइल ठेवत आहे करण

गेल्या काही दिवसांपासून करण जोहर स्वत:ला लो प्रोफाइल ठेवत आहे. त्याने ट्विटरवर 8 लोक (अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख  खान, नरेंद्र मोदी आणि 4 ऑफिस सदस्य) वगळता इतर सर्वांना अनफॉलो केले आहे. . तसेच इंस्टाग्रामच्या कमेंट सेक्शनलाही सामान्य लोकांसाठी लॉक केले आहे.

  • करणला केवळ शत्रुघ्न सिन्हांचा मिळाला पाठिंबा  

शत्रुघ्न सिन्हा यांनी नेपोटिझमच्या मुद्यावरुन करण जोहरला पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, करणला विनाकारण लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार करणने आलियाने लाँच केला आहे. पण ती त्याची नातेवाईक नाही. त्यामुळे यात नेपोटिझमचा प्रश्नच येत नाही.

शत्रुघ्न यांनी सुशांतला श्रद्धांजली वाहताना म्हटले की,  त्याने एवढे मोठे पाऊल का उचलले हे देवालाच ठाऊक आहे. त्याचा मृत्यू झाल्यापासून काही लोक अनावश्यकपणे हे प्रकरण ओढत आहेत. शत्रुघ्न यांच्या मते सुशांतचे असे काही मित्र अचानक पुढे येत आहेत, ज्यांनी त्याच्याशी कधी भेट देखील झालेली नाही. हे चुकीचे आहे आणि ते बंद केले जावे.

बातम्या आणखी आहेत...