आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुष्य-करिअरमधील चढउतार:करण जोहरने 43 चित्रपट बनले, 12 नवोदित कलाकारांना संधी दिली, त्यापैकी 7 आहेत स्टार किड्स

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर करण जोहर वादात अडकला आहे. त्याच्यावर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.

जन्म - 25 मे 1972 (मुंबई) शिक्षण- बी.कॉम (एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई) सन्मान - पद्मश्री, फिल्मफेअर, आयफासह 24 हून अधिक पुरस्कार कुटुंब- दिवंगत वडील यश जोहर (धर्मा प्रॉडक्शन) आई- हीरू जोहर जुळी मुले - यश आणि हीरु 

चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि टीव्ही होस्ट करण जोहरवर चित्रपटसृष्टीत घराणेशाही (नेपोटिजम) पसरवल्याचा आरोप आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर हे प्रकरण चर्चेत आहे. विशेष म्हणजे 2017 मध्येदेखील त्याच्यावर असेच आरोप लावले गेले आहेत.

‘कुछ कुछ होता है’ या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यापासून करणने आतापर्यंत एकूण 43 चित्रपटांचे दिग्दर्शन, निर्मिती व सह-निर्मिती केली आहे. यापैकी 8 चित्रपटांमध्ये त्याने 12 नवोदित कलाकारांना पहिल्यांदा संधी दिसील. यापैकी सात जणांना म्हणजे वरुण धवन, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, ईशान खट्टर, सना कपूर, अनन्या पांडे आणि शिखा तलसानिया या स्टार किड्सना त्याने इंडस्ट्रीत लाँच केले. 

करण जोहर हा चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यश जोहर यांचा मुलगा आहे. तो दक्षिण मुंबईतील मलबार हिल भागातल्या पॉश भागात लहानाचा मोठा झाला.  यश-हीरू जोहर यांचा करण एकुलता एक मुलगा आहे. असे म्हटले जाते की, भावंड नसल्याने त्याने आपले संपूर्ण बालपण एकाकीपणा आणि निराशेमध्ये व्यतीत केले. तो कोणाबरोबरही खेळायचा नाही, त्याला मित्र नव्हते, कुणी त्याच्याशी बोलायचेदेखीलनाही. लोक त्यांना जाड आणि एफीमिनेट (मुलींसारखे) म्हणायचे.

इतकेच नाही तर शाळेतही त्याच्याशी कुणी बोलायचे नाही. करण म्हणतो की, त्याच्याकडे बालपणी कोणतेही सामाजिक कौशल्य नव्हते, म्हणून दून सारख्या शाळेत त्याला प्रवेश मिळाला नाही. तथापि, शाळेत वादविवाद स्पर्धा आणि नाटकात भाग घेतल्यानंतर हळू हळू त्याचा आत्मविश्वास वाढला. 48 वर्षीय करण अविवाहित आहे. 2017 मध्ये, त्याला सरोगेसीच्या माध्यमातून जुळी मुली झाली. त्याने आपल्या मुलांची नावे आईवडिलांच्या नावावर ठेवले. त्याच्या मुलाचे नाव यश तर मुलीचे नाव हीरु आहे. 

  • भीती : लोक चिडवायचे, नवीन डिशेसच्या मदतीने दूर करायचा तणाव

  लहानपणापासूनच वजन जास्त असल्याने करण खेळण्या बागडण्यापासू  दूर राहिला. त्याला अनेकदा मुलींच्या ग्रुपमध्ये राहणे आवडायचे. त्याच्या सोबतचे काही जण त्याला 'पैंसी' (मुलींसारखे) म्हणू लागले. बारावीनंतर त्याची पहिल्या मालिका इंद्रधनुष्याच्या शूटिंगदरम्यान एक सहकारी कलाकाराने त्याला एफिमिनेट म्हटले होते. 

करण म्हणतो की, त्यावेळी कुणीही गे हा शब्द वापरत नव्हता, परंतु त्याचा अर्थ असाच होता. तेव्हापासून करणने बरीच वर्षे अभिनय केला नाही. करण म्हणतो की, हा मानसिक छळ, एकाकीपणा आणि तणावावर मात करण्यासाठी तो नवीन पदार्थ ट्राय करायचा. करण फूडी आहे.

  • रिलेशनशिप: 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटातून सांगितली मनातील गोष्ट

2016 च्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटानंतर करणने कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही. या चित्रपटाची कथा आणि पटकथादेखील करणने स्वत: लिहिली होती. करण म्हणतो की, हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील सत्य आहे. त्याच्या आयुष्यात दोनदा एकतर्फी प्रेम अपूर्ण राहिले.

पहिले नाते वयाच्या 20 व्या वर्षी आणि दुसरे नाते वयाच्या 30 व्या वर्षी तुटले. दुस-यांदा तो इतका तुटला होता की, त्याला बरे होण्यासाठी मानसशास्त्रज्ञाची मदत घ्यावी लागली होती. बरेच महिने औषधे खावी लागली. करण म्हणतो की, त्यांने स्त्रियांसारख्या सवयी बदलण्यासाठी आवाज आणि देहबोलीवरही काम केले.

  • मैत्री : आदित्यने 'डीडीएलजे'मध्ये घेतले, त्यानेच दिग्दर्शक बनवले

करणच्या आई-वडिलांची इच्छा होती की, त्याने चित्रपटसृष्टीपासून दूर राहावे. पदवीनंतर तो फ्रान्सला जाणार होता. याच दरम्यान, चित्रपट वितरक अनिल थडानी (रवीना टंडन यांचे पती) आणि जुना मित्र आदित्य चोप्रा यांच्याशी त्याची जवळीक वाढू लागली. तिघेही बसून चित्रपटांवर चर्चा करायचे.

करण आदित्यला त्याचा पहिला चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'च्या पटकथा लिखाणात मदत करत होता. दरम्यान, आदित्यने त्याला या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेची ऑफर दिली. करण म्हणतो की, आदित्यने माझ्यातील फिल्ममेकरलाओळखले. त्यानेच मला चित्रपट बनवण्याची प्रेरणा दिली.

  • वाद : चित्रपट व्यवसायावर परिणाम केल्याचा आरोप

शाहरुख खानबरोबर करण नात्यात असल्याच्या अफवादेखील उडाली होती. मात्र, नंतर करणने या सर्वांचे खंडन केले. अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटाच्या निगेटिव्ह पब्लिसिटीसाठी क्रिटिकला 25 लाख रुपये दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. घरात ड्रग पार्टी केल्याचाही आरोप त्याच्यावर लागला होता. 

‘बँड बाजा बारात’ या चित्रपटात अनुष्का शर्माला कास्ट न करण्याचा दबाव करणने आदित्य चोप्रावर आणला होता. 2017 मध्ये नेपोटिझमवर तो म्हणाला होता की, संधी मिळाली तर शाहरुख खानच्या मुलालादेखील माझ्या चित्रपटातून लाँच करेल. 

(टीपः या स्टोरीतील काही अंश पेंग्विन पब्लिकेशन्समधून प्रकाशित झालेल्या करण जोहरच्या 'अ‍ॅन अनसूटेबल बॉय' या आत्मचरित्रामधून साभार घेतले आहेत.)

बातम्या आणखी आहेत...