आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्मा प्राॅडक्शनला 40 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण जोहर 14 नव्या चेहऱ्यांना लाँच करणार आहे. त्याच्या बॅनरखाली आता हे नवे दिग्दर्शक दिसणार आहेत. करणने यांचा एक फोटो आपल्या सोशल मीडियावर पेजवर शेअर केला आहे.
फोटो शेअर करत करण जोहरने लिहिले, धर्मा प्रॉक्डशनचे दिग्दर्शक... प्रॉडक्शनच्या बॅनर खाली हे दिग्दर्शक मल्टिपल झोनर्स अंतर्गत आपली प्रतिभा दाखवतील, यात सायकॉलॉजिकल थ्रिलर्स, रोमान्स, अॅक्शन सारख्या विषयाचा समावेश असेल. हे नवोदित दिग्दर्शक डिजिटल माध्यमांपासून ते चित्रपटगृहाच्या निर्मिती पर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपली सृजनशीलता दाखवण्यासाठी तयार आहेत. यांच्यासाठी चांगल्या कथा लिहिल्या जात असल्याचे करणचे म्हणणे आहे. मागील 4 दशकांपासून 20 दिग्दर्शक धर्मा प्रॉडक्शनने तयार केले आहेत, असेही करणने सांगितले आहे.
सोबतच करणने सर्वांची नावेही लिहिली आहेत. कॉलीन डीकुन्हा, शरण शर्मा, राज मेहता, भानु प्रताप सिंह, पारस चक्रवर्ती, विवेक सोनी, अमृतपाल बिंद्रा, आनंद तिवारी, करण सिंह त्यागी, अनुभूति कश्यप, शाजिया इकबाल, पुष्कर ओझा, सागर आमरे आणि कयोज ईरानी या नवीन दिग्दर्शकांसोबत आता करण जोहर काम करणार आहे.
5 नवीन प्रोजेक्ट्सची केली घोषणा
करणने धर्मा प्रॉडक्शनच्या पाच नव्या प्रोजेक्ट विषयीदेखील आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. हे पाच प्रोजेक्ट या वर्षी नेटफ्लिक्सवर एकापाठोपाठ दाखवले जातील. यात ‘फायंडिंग अनामिका’,‘अजीब दास्तान’, ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’, ‘सर्चिंग फॉर शीला’ आणि ‘फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलीवूड वाइव्हज सीझन 2’ सारखे मल्टिस्टारर प्रोजेक्ट आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.