आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत सुसाइड केसमध्ये ट्रोलिंगचा परिणाम:करण जोहरला मोठा धक्का, बोलण्याच्या स्थितीतही नाही, फोन केला तर तो रडायला लागतो, जवळच्या मित्राने केला दावा 

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 जूनला सुशांतने आत्महत्या केली, यानंतर करण जोहरवर सातत्याने नेपोटिझमला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला जात आहे
  • 25 दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय नाही करण, शेवटची पोस्ट सुशांतला श्रद्धांजली वाहण्याची होती

सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिज्मला प्रोत्साहन दिल्याचा आरोप लावण्यात आल्यानंतर करण जोहरला फारच दुखापत झाली आहे. तो बोलण्याच्या स्थितीत नाहीत. जेव्हा कोणी कॉल करते तेव्हा तो पूर्णपणे कोलमडतो आणि रडायला लागतो. तसेच मी खरंच या सर्वांसाठी जबाबदार आहे का असंही तो विचारतो? रिपोर्ट्सनुसार करणच्या जवळच्या मित्राने हा दावा केला आहे.

बॉलिवूड हंगामाने करणच्या जवळच्या मित्राचा हवाला देत लिहिले की, - करण पूर्णपणे कोलमडला आहे. त्यांला बर्‍याच वर्षांपासून ट्रोल केले गेले आहे आणि करण विचार करायचा की, याचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. परंतु सुशांतच्या मृत्यूनंतर त्याने जो द्वेष पाहिला यामुळे पूर्णपणे कोलमडला आहे.

मुलांना मिळतेय जीवे मारण्याची धमकी 

रिपोर्ट्सनुसार- करणसोबतच त्याच्या जवळच्या मित्रांनाही लक्ष्य केले जात आहे. म्हणून करण जोहरला खरोखर दोषी असल्यासारखे वाटत आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या जुळ्या मुलांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अनन्या पांडेसारख्या लोकांचा सोशल मीडियावर द्वेष केला जात आहे. त्यांना सुशांतच्या आत्महत्येची परफेड म्हणून आत्महत्या करण्यास सांगितले जात आहे. खरंतरं त्यांचा आणि सुशांतचा काहीही संबंध नाही. 

वकीलने करणला दिला शांत राहण्याचा सल्ला दिला

करण पुढे येऊन या विषयावर उत्तर देईल काय? या प्रश्नाचे उत्तर देताना करणचा मित्र म्हणाला की- अजिबात नाही. त्याच्या वकिलांनी या प्रकरणात गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे. करण काही बोलण्याची स्थितीत नाही. 

करणसोबत बोलण्याचा अनुभव चांगला नव्हता. जेव्हा आम्ही त्यांना कॉल करतो तेव्हा तो पूर्णपणे कोलमडतो. तो सतत रडत आहे आणि विचारतोय की, मी खरंच या सर्व गोष्टींना जबाबदार आहे का? मित्राने सांगितले की, तो करणसाठी खूप घाबरलेला आहे.

25 दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर आहे करण 

करण जोहर हा 25 दिवसांपासून ट्विटर आणि इंस्टाग्रामपासून दूर आहे. त्याने 14 जूनला अखेरची पोस्ट सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली देण्यासाठी केली होती.करणने सुशांतच्या आत्महत्येवर दुःख व्यक्त केले होते. तसेच गेल्या वर्षभरापासून सुशांतच्या संपर्कात नसल्यामुळेही दुःख व्यक्त केले होते. 

0