आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर कमबॅक:सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनंतर करण जोहरची पहिली पोस्ट, ट्रोलिंगला कंटाळून या प्लॅटफॉर्मपासून गेला होता दूर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करण जोहरने इंस्टाग्रामवर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
  • यापूर्वी 14 जून रोजी सुशांतच्या निधनानंतर त्याने शेवटची पोस्ट टाकली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावरून गायब झालेला करण जोहर दोन महिन्यांनंतर परतला आहे. शनिवारी दुपारी त्याने तिरंग्याचा फोटो शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. करणने कॅप्शनमध्ये लिहिले, "आपला महान देश, जो संस्कृती, वारसा आणि इतिहासाचा खजिना आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद." दोन तासात करणच्या पोस्टला 61 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले. तर कमेंट काही निवडकांकडून आल्या. कारण त्याने आपला कमेंट सेक्शन लिमिटेड ठेवला आहे.

  • यापूर्वी करणने शेवटची पोस्ट 14 जून रोजी टाकली होती

यापूर्वी करण जोहरने 14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी पोस्ट टाकली होती, ज्यात त्याने दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली होती. करणने लिहिले होते- 'गेल्या एका वर्षापासून तुझ्याशी संपर्क न ठेवल्याबद्दल मला दोषी वाटत आहे. मला जाणीव आहे की, तुला किती गरज होती. आमच्या सर्वांसोबत तुझ्या आयुष्यातील गोष्टी शेअर करु शकत होता. परंतु मी हे सगळं नाही करु शकलो. मी नेहमी ही चुक लक्षात ठेवेन. आपण नाते फक्त जोडायलाच नाही पाहिजे तर ते निभवायला पाहिले. आज सुशांत मला शिकवून गेला की, प्रत्येक नातं सांभाळायला हवं. तुझी स्माईल आणि गळाभेट घेण्याचा अंदाज कायम लक्षात ठेवेन', अशा आशयाची पोस्ट करणने टाकली होती.

  • सुशांतच्या मृत्यूनंतर करण ट्रोल झाला होता

सुशांतच्या निधनानंतर तो नैराश्यात असल्याचे समोर आले. यानंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा सुरु झाली होती. करण जोहरवर घराणेशाही आणि गटबाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला गेला. त्यामुळे सोशल मीडिया यूजर्सनी करणला चांगलेच ट्रोल केले होते. त्यामुळे कंटाळलेल्या करण जोहरने स्वतःला सोशल मीडियापासून दूर केले होते. इतकेच नाही तर स्वतःचा फोन नंबरही बदलला होता.

  • ट्विटरवर मित्रांना केले होते अन-फॉलो

सततच्या ट्रोलिंगला कंटाळून करणने आपल्या ट्विटर अकाउंटवरून आलिया भट्ट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि काजोल यांच्यासह अनेकांना अनफॉलो केले आहे. सध्या करण पंतप्रधान नरेंद्र मोदी, मेगास्टार अमिताभ बच्चन, अभिनेता अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांच्यासह 8 लोकांनाच फॉलो करतोय.

बातम्या आणखी आहेत...