आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळला करण जोहर:पाच वर्षानंतर चित्रपट दिग्दर्शित करणार करण, रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबत बनवणार 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होईल.

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर तब्बल पाच वर्षानंतर दिग्दर्शनाकडे वळला आहे. दिग्दर्शक म्हणून करणने त्याच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. त्याच्या पुढच्या चित्रपटाचे नाव 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' असे आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे लेखन इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी केले आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होईल. सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा करताना करणने लिहिले की, 'मी माझ्या पसंतीच्या लोकांसह कॅमेर्‍याच्या मागे काम करण्यास खूप उत्साही आहे.'

5 जुलै रोजी सांगितले होते - दिग्दर्शनाकडे परतणार

यापूर्वी 5 जुलै रोजी करणने आपल्या चित्रपटांच्या क्लिप्सचा एक व्हिडिओ शेअर करताना दिग्दर्शक म्हणून त्याचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला होता. पाच वर्षांनी तो पुन्हा एकदादिग्दर्शनाकडे वळणार असल्याचे त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते. करणने लिहिले होते की, "नव्या प्रवासाची ही सुरुवात आहे, आपल्या आवडत्या जागी परत जाण्याची वेळ आली आहे, कॅमे-याच्या मागे जाऊन काही संस्मरणीय प्रेमकथा तयार करण्याची वेळ आली आहे."

1998 मध्ये पदार्पण करणने

1998 मध्ये 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. यानंतर त्याने 'कभी खुशी कभी गम', 'कभीअलविदा ना कहना', 'माय नेम इज खान', 'स्टुडंट ऑफ द इयर' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. दिग्दर्शक म्हणून त्याचा शेवटचा चित्रपट 'ऐ दिल है मुश्किल' हा होता. हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता. याशिवाय करणने 'बॉम्बे टॉकीज', 'लस्ट स्टोरीज' आणि 'घोस्ट स्टोरीज' यासारख्या काही निवडक सेग्मेंट्स दिग्दर्शित केले होते. निर्माता म्हणून त्याने 'सूर्यवंशी', 'ब्रह्मास्त्र', 'दोस्ताना 2', 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...