आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनेक कारणांमुळे थंड बस्त्यात गेला 'तख्त':अडीच वर्षानंतर करण जोहरने बंद केला मल्टीस्टारर चित्रपट, 'या' कारणांमुळे सद्यस्थितीत घेऊ इच्छित नाही कुठलीही रिस्क

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करणने त्याचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट थंड बस्त्यात टाकला

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा 'तख्त' हा चित्रपट 2018 पासून चर्चेत होता, पण आता करणने हा प्रोजेक्ट थंड बस्त्यात टाकल्याचे ऐकण्यात येत आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात त्याने यापूर्वीच रणवीर सिंह, करीना कपूर, आलिया भट्ट, अनिल कपूर, जान्हवी कपूर, विक्की कौशल आणि भूमी पेडणेकर या सात सुपरस्टार कलाकारांना घेतले होते. यामागे बरीच कारणे आहेत.

पहिले मोठे कारण

याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशाचे सध्याचे राजकीय वातावरण असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट मुघल शासक औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शिकोह यांच्यातील सिंहासनाच्या लढाईवर आधारित आहे. परंतु निर्मात्यांना असे वाटले होते की, राजकारणातील सद्यस्थितीच्या वातावरणात मुघल इतिहासावर चित्रपट बनविणे त्यांना अडचणीत आणू शकते. याशिवाय ऐतिहासिक चित्रपटांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे, ज्यामुळे हा चित्रपट तयार झाल्यास तो रिलीज करण्यात अडचण येऊ शकते.

दुसरे कारण : चित्रपटाचे बजेट
कोविडमुळे चित्रपट निर्मात्यांचे नुकसान हे यामागील दुसरे मोठे कारण असल्याचे बोलले जात आहे. करण या चित्रपटावर सुमारे अडीचशे ते तीनसे कोटी रुपये खर्च करणार होता. परंतू आता तो याबद्दल मोठी रिस्क घेऊ इच्छित नाही. लॉकडाउनमुळे चित्रपट व्यवसायाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मेकर्स आता एवढा पैसा चित्रपटावर खर्च करुन रिस्क घेऊ इच्छित नाही. कारण यापूर्वीच ब्रह्मास्त्र हा बिग बजेट चित्रपट लांबणीवर पडला आहे. या चित्रपटाचे बजेट 350 कोटी आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन स्टारर ब्रह्मास्त्र कधी रिलीज होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

तिसरे कारण : फॉक्स स्टार स्टुडिओने घेतला काढता पाय
रिपोर्ट्सनुसार, तख्तची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ करणार होते. मात्र त्याचा आता चित्रपटाशी संबंध राहिला नाही. करणने अनेक प्रयत्न करुनही स्टुडिओने या चित्रपटात रस घेतलेला नाही. कारण त्यांना हा चित्रपट वादात अडकण्याची शक्यता वाटतेय. अशा परिस्थितीत करणने हा चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील काही वर्षांत चित्रपटावर काम सुरू होऊ शकते

2016 मध्ये रिलीज झालेल्या 'ऐ दिल है मुश्किल' नंतर करण जोहर तख्तद्वारे दिग्दर्शक म्हणून परतणार होता.या चित्रपटात रणवीर सिंह आणि विक्की कौशल शिकोह आणि औरंगजेबाची भूमिका साकारणार होते. चित्रपटात अनिल कपूर शाहजहां, करीना कपूर जहानारा बेगम आणि आलिया भट्ट दिलरास बानोच्या भूमिकेत दिसणार होत्या. इतकेच नाही तर भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात होत्या. रिपोर्ट्सनुसार, पुढील काही वर्षांत करण या प्रोजेक्टवर पुन्हा काम करण्याचा विचार करु शकतो.

बातम्या आणखी आहेत...