आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठा करार:'अर्जुन रेड्डी' फेम विजय देवरकोंडाबरोबर करण जोहरची 3 चित्रपटांची डील, अभिनेत्याने घेतले तब्बल 100 कोटी रुपये

किरण जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसर्‍या चित्रपटात विजयला स्टायलिश दाखविण्याची योजना

'अर्जुन रेड्डी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकलेला साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. करण जोहरच्या होम प्रॉडक्शनमध्ये बनत असलेल्या 'लाइगर' या चित्रपटात विजय मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट पुरी जगन्नाथ दिग्दर्शित करत आहेत. विजयने करण जोहरसोबत केवळ एका नव्हे तर आणखी दोन चित्रपटांचा करार केला आहे. एकाच वेळी तीन चित्रपटांच्या करारावर सही करण्यासाठी विजयला 100 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

पॅन-इंडिया आणि बॉलिवूड चित्रपट बनवण्याची योजना आहे
सूत्रांच्या माहितीनुसार, "करण जोहरने विजयशी करार केला आहे. करणने विजयला सुमारे 100 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. या करारानुसार करणच्या धर्मा प्रॉडक्शन बॅनरखाली विजयला तीन चित्रपट करावे लागणार आहेत. करण विजयसोबत आणखी जास्त पॅन-इंडिया आणि बॉलिवूड चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे . त्याने विजयला नॅशनल स्टार बनवण्याचे आश्वासन दिले आहे. या करारानुसार, विजयला एकाच वेळी हे तीन चित्रपट करण्याची गरज नाही. जसजसा वेळ मिळेल तसतसे तो करणच्या चित्रपटात काम करू शकेल.'

दुसर्‍या चित्रपटात विजयला स्टायलिश दाखविण्याची योजना
सूत्रांनी पुढे सांगितल्यानुसार, "विजय लाइगर या चित्रपटात अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे, तर दुस-या चित्रपटात विजयने रोमँटिक भूमिका साकारावी असे करणचे मत आहे. त्याचा पुढचा चित्रपट टिपिकल करण जोहर स्टाईलचा असेल. या रोमँटिक-ग्लॅमरस चित्रपटात विजयला स्टायलिश दाखवले जाणार आहे. सध्या त्याच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे."

बातम्या आणखी आहेत...