आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो ट्रोल्स अलाऊड:खून आणि बलात्काराची धमकी देणाऱ्या ऑनलाइन ट्रोलर्स विरूद्ध कायदेशीर कारवाई करणार सेलिब्रिटी, करण जोहरने घेतला पुढाकार 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करण जोहर आता ट्रोलर्सच्या विरोधात आवाज उठवण्याची तयारी करीत आहे.

सोशल मीडियाची निर्मिती एका सुंदर व स्वच्छ विचाराने झाली होती. काही वर्षांपूर्वी सगळं काही ठीक होत, पण हल्ली परिस्थिती हात बाहेर गेली आहे. सोशल मीडिया साईट्सचा लोक आपल्या आयुष्यातील काही माहितीपूर्ण आणि सकारात्मक गोष्टी व घटना लोकांपुढे आणण्यासाठी करायचे. पण आता या माध्यमाचे रूपांतर राक्षसाच्या रुपात झाले आहे. काही समाज कंटक आज या माध्यमाचा उपयोग लोकांविरोधात कट-कारस्थान करण्यासाठी करत आहेत. जरी याचा आघात शारीरिक नसला तरी मानसिक व भावनात्मकदृष्ट्या अशा गोष्टी खूप त्रास देतात.

सेलिब्रिटींना नेहमीच अशा असंवेदनशील संदेशांना समोर जावं लागतं, मुळात लिहिणा-यांना वाटतं की त्यांना समोरच्याला धमकी देण्याचा पूर्ण अधिकार आहे. ही गोष्ट फक्त लिखित संदेशांची नाहीये, ट्रोलर्स आता खालच्या पातळीवर जाऊन शारीरिक इजा पोहोचविण्याच्या धमक्या देखील देऊ लागले आहेत.

सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू लक्षात घेता लोकांनी घराणेशाहीच्या चर्चेला वेगळेच वळण दिले आहे. यामुळे करण जोहर, आलिया भट्ट, सलमान खान, सोनम कपूर आदी सेलेब्रिटींना सोशल मीडियावरुन सतत ऑनलाईन द्वेषाचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच आलिया भट्ट आणि शाहीन भट्टदेखील ट्रोलर्सच्या निशाण्यावर पाहायला मिळाल्या, पण शाहिनने हिंमतीने सोशल मीडिया ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले. अशीच घटना अभिनेत्री रिया चक्रवर्तीलासोबतही घडली. तिला काहींनी बलात्काराची धमकी दिली. ही बाब तिने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन समोर आणली.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, करण जोहर, ज्याने या ट्रोलर्सचा अधिक सामना केला आहे, आता त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याची तयारी करीत आहे. भारतीय राज्यघटनेचे पालन करत तो  कायदेशीर मार्गांनी त्यांच्या वकीलांचा सल्लाही घेत आहे.

करण जोहरच्या निकटवर्तीयातील एक सूत्र म्हणतो, "करण सक्रियपणे कायदेशीर कारवाईचा पाठपुरावा करीत आहे. वकिलांची टीम तसेच ऑनलाईन तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ एकत्र येऊन या घटनांचे विश्लेषण करीत आहेत. टीमचे तांत्रिक लोक सोशल मीडिया हँडल्सचा मागोवा घेत आहेत. ही खाती, बनावट आहेत की वास्तविक याचा शोध घेऊन ते संबंधित अधिकाऱ्यांकडे पुरावे देण्याची तयारी करीत आहेत. जेव्हा काही लोकांनी करणच्या मुलांना शारीरिक इजा पोहोचवणार असल्याची आणि त्यांच्या आईवर बलात्कार करण्याची धमकी दिली तेव्हा हे ट्रोलिंग हाताबाहेर गेले व करणला देखील हे सहन झाले नाही."

या आधी ही अनेक सेलिब्रिटी जेव्हा अशा साइबर-क्राइमचा शिकार झाले तेव्हा त्यांनी देखील एफआयआर दाखल केल्या होत्या आणि आता पोलीस देखील गंभीर झाले आहेत. या सर्व बाबींची पोलीस कठोर चौकशी करणार आहेत.

भारतीय कायद्याच्या कलम 67 आणि आयपीसीच्या कलम 7० नुसार जर कोणी व्यक्ती सोशल मीडियावर शिवीगाळ किंवा हिंसक संदेश देत असेल तर त्याला लाखो रुपयांच्या दंड व तुरूंगवासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

ऑनलाइन ट्रोलर्सनी त्यांच्या गुन्ह्याला गांभीर्य समजून घेतले पाहिजे व 'ऑनलाइन प्रोफाइल' माघे लपून इतरांना धमकावण्यापासून स्वत:ला रोखले पाहिजे अन्यथा त्यांना कायदेशीररित्या अशा कृत्यांचे परिणाम भोगावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...