आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोस्ताना 2:चित्रपटातून काढल्यानंतर करण जोहरने केले कार्तिकला अनफॉलो, वादात आता कंगनाची उडी, म्हणाली -  सुशांतप्रमाणे त्याला गळफास घेण्यास भाग पाडू नका

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने तिच्या पोस्टमध्ये काय लिहिले?

बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी ‘दोस्ताना 2’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता कार्तिक आर्यनला रिप्लेस करण्यात आले आहे. करण जोहरने शुक्रवारी याची अधिकृत घोषणा करत कार्तिक आर्यनला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. कार्तिक मात्र अद्याप करणला फॉलो करतोय. आता करण जोहर आणि कार्तिक आर्यन यांच्या वादात अभिनेत्री कंगना रनोट हिने उडी घेतली आहे. तिने आपला रोष व्यक्त करत करण जोहरवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. सुशांतप्रमाणे कार्तिकला गळफास घेण्यास भाग पाडू नका, असे कंगनाने करणला उद्देशून म्हटले आहे.

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये काय लिहिले?
कंगनाने सोशल मीडियावर लिहिले, 'कार्तिक आर्यन स्वतःच्या मेहनतीवर इथवर पोहोचला आहे आणि यापुढेही तो स्वतःच्या मेहनतीवरच पुढे जात राहील. फक्त 'पापा जो' आणि त्यांची नेपो गँग यांना विनंती आहे की, कृपया आता त्याला एकटं सोडा. सुशांतसिंह राजपूतसारखे आता कार्तिकच्या मागे लागून त्याला फासावर लटकण्यास असहय्य करू नका. गिधाडांनो कृपया त्याला एकटं सोडा,' असे कंगना म्हणाली आहे.

'त्यांनी सुशांतबरोबरही असेच केले'
कंगनाने पुढे लिहिले, 'कार्तिक आर्यन या चिल्लर लोकांना घाबरण्याची गरज नाही. वाईट आर्टिकल लिहून आणि घोषणा करून हे लोक फक्त तुझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मग यासाठी तुलाच जबाबदार ठरवून स्वतः गप्प राहतील. त्यांनी सुशांतसिंह राजपूतचे ड्रग्सचे व्यसन आणि वाईट व्यवहाराची कथा अशीच पसरवली होती.'

'आम्ही तुझ्याबरोबर आहोत'
कंगना पुढे म्हणाली, 'कार्तिक आर्यन आम्ही तुझ्यासोबत आहोत. ज्यांनी तुला तयार केले नाही ते तुला तोडूही शकत नाहीत. आज तुला कदाचित एकटे वाटत असेल पण असे वाटून घेण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येकाला 'ड्रामा क्वीन जो'बद्दल माहीत आहे. स्वतःवर विश्वास ठेव.'

धर्मा प्रॉडक्शनने अधिकृत निवेदनामध्ये काय म्हटले?
शुक्रवारी दिवसभर रंगलेल्या चर्चादरम्यान संध्याकाळी धर्मा प्रॉडक्शनच्या वतीने दोस्तान 2 चित्रपटाच्या कास्टिंगविषयी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यात म्हटले गेले की, व्यावसायिक परिस्थितीमुळे आम्ही सन्मानपूर्वक शांतता राखण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पुन्हा दोस्ताना 2 चे कास्टिंग करू. ज्याचे दिग्दर्शक कोलिन डीकुन्हा असतील. कृपया अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा.

'दोस्ताना 2' चे 20 दिवसांचे चित्रीकरण झाले होते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकने ‘दोस्ताना 2’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले होते. पहिल्या शेड्यूलमध्ये 20 दिवसांचे चित्रीकरण झाल्यानंतर त्याने पुढील डेट्स देण्यास नकार दिला होता. सध्या कार्तिककडे अनेक प्रोजक्ट्स असल्यामुळे तो कामात व्यग्र आहे. तसेच कार्तिकला या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील फारशी आवडली नसल्याने त्याने डेट्स दिल्या नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता करण जोहरने त्याला चित्रपटातून काढून टाकल्याचे समोर आले आहे. आता चित्रपट रीशूट करावा लागणार आहे. त्यामुळे धर्मा प्रॉडक्शनला 20 कोटींचे नुकसान होणार असल्याचे सांगितले जाते.

कार्तिक आणि जान्हवी यांच्यातील ईगो क्लॅशन हे आहे खरे कारण?
ट्रेड पंडितांनी सांगितल्यानुसार, यामागचे खरे कारण कार्तिक आणि जान्हवी यांच्यातील ईगो क्लॅश हे आहे. यामुळे कार्तिकने चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. त्याने थेट चित्रपटाला नकार दिला नाही. तारखा नसणे आणि क्रिएटिव्ह डिस्प्यूटचे कारण त्याने पुढे केले आहे. कार्तिक आर्यनचे काम सांभाळणारी एजन्सी KWAN चे अधिकारीदेखील या विषयावर मौन धारण करुन आहेत. ते काहीही अधिकृत सांगण्यास तयार नाही.

बातम्या आणखी आहेत...