आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे रविवारी लग्न झाले. या दोघांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत सप्तपदी घेतल्या. अलिबागच्या 'द मॅन्शन हाऊस' या आलिशान रिसॉर्टमध्ये दोघांचा भव्य लग्नसोहळा संपन्न झाला. वरुण आणि नताशाच्या लग्नाच्या निमित्ताने त्यांचे मित्र आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लग्नात सहभागी झालेल्या करण जोहरने भावनिक नोट शेअर करत वरुणला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
करण जोहरची भावनिक नोट
करण जोहरने एक इमोशनल नोट शेअर केली आहे. तो म्हणतो, ही पोस्ट लिहितांना माझे मन अनेक आठवणींनी भरुन आले आहे. गोव्यात जेव्हा मी या मुलाला भेटलो तेव्हा मला अजूनही आठवते, लांब केस, डोळ्यांत मोठी स्वप्ने आणि एक स्वॅग जो पडद्यावर दिसण्याची वाट पाहत होता. काही वर्षांनंतर हा मुलगा माझ्या 'माय नेम इज खान' चित्रपटात सहाय्यक झाला. मी शांतपणे त्याचे निरीक्षण केले, समर्पण, प्रामाणिकपणा आणि काम करण्याची तळमळ मी पाहिली. लोकांना हसवण्याची त्यांची क्षमता देखील पाहिली."
माझा मुलगा मोठा झाला
करणने पुढे लिहिले, 'जेव्हा मी त्याला पहिल्यांदा कॅमेर्यावर पाहिले तेव्हा एक वडील म्हणून मला त्याचा अभिमान वाटला. तीच फिलिंग आज माझ्यात परत आली आहे. जेव्हा मीत्याला सप्तपदी घेताना पाहिले, तेव्हा मला माझा मोठा मुलगा झाला आणि जीवनाच्या या सुंदर टप्प्यासाठी सज्ज आहे, असे वाटले. माझ्या प्रिय वरुण आणि नताशाचे अभिनंदन. माझे आशीर्वाद आणि प्रेम सदैव तुमच्यासोबत राहतील. ''
वेलकम टू डार्क साइट
शाहिद कपूरने वरुणला गमतीशीर पद्धतीने लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. वरुणने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोवर केंट करताना शाहिदने लिहिले, "दोन्ही कुटुंबांचे अभिनंदन. वेलकम टू द डार्क साइड वरुण." लग्नानंतर वरुणने स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. फोटो शेअर करताना, "आजीवन प्रेम अधिकृत झाले आहे," असे कॅप्शन दिले होते.
करणच्या चित्रपटाद्वारे वरुणने बॉलिवूडमध्ये केले होते पदार्पण
वरुण धवनने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या 'माय नेम इज खान' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होते. यानंतर करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून वरुणला मोठ्या पडद्यावर लाँच केले होते. या चित्रपटात वरुणसह आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी देखील काम केले होते. 'स्टुडंट ऑफ द इयर' नंतर वरुणने करणबरोबर 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'कलंक'मध्ये देखील काम केले आहे. वरुण लवकरच धर्मा प्रॉडक्शनच्या 'जुग जुग जिओ'मध्ये दिसणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.