आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकरण मल्होत्रा दिग्दर्शित शमशेरा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करु शकलेला नाही. या चित्रपटात रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत झळकले. चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्याबद्दल दिग्दर्शक करणने आता प्रतिक्रिया दिली आहे.
'शमशेरा' माझा आहे - करण
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना करणने लिहिले- "माझ्या प्रिय शमशेरा, तू तितकाच भव्य आणि विलासी आहेस. या व्यासपीठावर स्वतःला व्यक्त करणे खूप महत्वाचे आहे कारण येथे तुझ्या प्रेम, द्वेष, उत्सव आणि अपमान आहे. मला माफी मागायची आहे कारण मी द्वेष आणि राग हाताळू शकलो नाही. माझी माघार ही माझी कमजोरी होती आणि त्यासाठी मी कोणताही एक्सक्यूज देणार नाही."
करणने पुढे लिहिले - "आता मी येथे आहे, तुझ्यासोबत उभा आहे आणि तू माझा आहेस याचा मला अभिमान वाटतो. आपण सर्व गोष्टींचा सामना करू, मग ते चांगले असो वा वाईट. शमशेरा टीमला माझे प्रेम. शमशेरा माझा आहे," अशा शब्दांत करण व्यक्त झाला आहे.
जगभरात या चित्रपटाचे अनेक शो रद्द करण्यात आले
खराब प्रदर्शनानंतर जगभरातील चित्रपटगृहांत या चित्रपटाचे आतापर्यंत अनेक शो रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रणबीरचा हा कमबॅक चित्रपट त्याचा आणखी एक फ्लॉप ठरेल, असे व्यापार विश्लेषकांचे मत आहे. रणबीर चार वर्षांनी 'शमशेरा' या चित्रपटाद्वारे परतला आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या संजय दत्तच्या बायोपिक 'संजू'मध्ये तो शेवटचा दिसला होता.
त्याचबरोबर रणबीरचा 'शमशेरा' अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' आणि पत्नी आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'ला ओपनिंग वीकेंडला कमाईच्या बाबतीत मागे सोडू शकलेला नाही. मात्र, खराब ओपनिंगनंतरही 'शमशेरा' हा रणबीरच्या कारकिर्दीतील मात्र सर्वाधिक ओपनिंग असलेला 6वा चित्रपट ठरला आहे.
जर 'शमशेरा'ने 165 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला तर हा चित्रपट हिट मानला जाईल, असे सांगितले जात आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरेल, असे व्यापार विश्लेषकांचे मत आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त संजय दत्त, वाणी कपूर, रोनित रॉय आणि सौरभ शुक्ला हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.