आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Kareena Kapoor Asked The Question About Fees Gap Between Actor And Actress In Bollywood, Anil Kapoor Answer You Took Too Much Money From Me

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चॅट शो 'व्हॉट व्हूमन वॉन्ट':करीनाने अभिनेता-अभिनेत्री यांच्या मानधनातील तफावतबद्दल उपस्थित केला प्रश्न, उत्तर देताना अनिल म्हणाले - 'तू तर माझ्याकडून खूप पैसे घेतलेस..'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात करीना झळकली होती.

अभिनेते अनिल कपूर यांनी अलीकडेच करीना कपूरच्या 'व्हॉट व्हूमन वॉन्ट' या चॅट शोमध्ये खास पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी करीनाने त्यांना बॉलिवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यातील मानधनातील तफावतीबद्दल प्रश्न विचारला. हॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे महिला सहकलाकाराला बरोबरीचे मानधन मिळत असेल तरच त्या प्रोजेक्टमध्ये काम करायला तयार असतात. बॉलिवूडमध्येही अशी पद्धत रुजू करायला पाहिजे का? असा प्रश्न करीनाने अनिल यांना विचारला. त्यावर अनिल कपूर यांनी दिलेले उत्तर ऐकून ती काही सेकंदांसाठी स्तब्ध झाली.

तू माझ्याकडून खूप पैसे घेतले
करीनाच्या या प्रश्नावर उत्तर देताना अनिल कपूर म्हणाले, 'तू तर माझ्याकडून खूप पैसे घेतलेस.' अनिल कपूर यांची निर्मिती असलेल्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात करीना झळकली होती.

ती म्हणेल तेवढे पैसे तिला द्या
अनिल कपूर यांनी पुढे संपूर्ण किस्सा सांगितला. ते म्हणाले, जेव्हा मानधनाची चर्चा सुरू होती तेव्हा एका निर्मात्याने मला फोन करून सांगितले, “यार, ही तर हिरोपेक्षाही जास्त पैसे मागतेय.” त्यावर अनिल कपूर म्हणाले, 'ती जेवढे मागतेय तेवढे तिला देऊन टाक.'

मी अनेकदा अभिनेत्रींपेक्षा कमी पैसे घेतले
अनिल पुढे म्हणाले, अनेकदा मी भूमिका केलेल्या चित्रपटात अभिनेत्रीला जास्त मानधन मिळाले आहे. त्यांनी सांगितले, 'असे अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीने माझ्यापेक्षा जास्त मानधन घेतले आणि मी आनंदाने त्या चित्रपटात काम केले.'

आगामी 'तख्त' चित्रपटात एकत्र दिसणार करीना-अनिल

अनिल आणि करीना यांनी 'बेवफा' आणि 'टशन' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता हे दोघे पुन्हा एकदा करण जोहरच्या तख्तमध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, विक्की कौशल आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. याशिवाय अनिल आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत रणबीर कपूर, बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडे अनिल 'AK Vs AK' या चित्रपटात दिसले होते. 24 डिसेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...