आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाचा मदतीचा हात:काेराेनामुळे पती गमावलेल्या महिलांना मदत करणार करीना कपूर, म्हणाली -  त्यांना पुन्हा उभे करण्यास मदत करू

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीनाने लिहिले, या उपक्रमात कोणीही वॉलेंटियर म्हणून काम करू शकते.

करीना कपूरने सोशल मीडियावर एक माहिती शेअर केली आहे. ही माहिती त्या महिलांसाठी आहे, ज्यांच्या पतीचा मृत्यु कोरोनामुळे झाला आहे. करीना त्यांच्या दु:खात सहभागी असून तिने सहानुभूती व्यक्त केली आहे. पोस्टमध्ये त्यांना रोजगार मिळवण्यात मदत मिळू शकते. करीनाने लिहिले, या उपक्रमात कोणीही वॉलेंटियर म्हणून काम करू शकते.

खेड्यापाड्यापर्यंत पाेहोचवू मदत
या पोस्टमध्ये लिहिले, पतीला गमावल्याचं दुःख त्या महिलेव्यतिरिक्त काेणीही समजू शकत नाही. मात्र त्यांना पुन्हा उभे करण्यास तुम्ही नक्कीच मदत करू शकता. रीम सेनच्या या पोस्टमध्ये कोविड विडोज डॉट इनवर याविषयी माहिती देण्यात आली आहे. ही वेबसाइट समुपदेशन, देखरेखच्या माध्यमातून महिलांना काम मिळवून देणार आहे. यासाठी सरकार आणि एनजीओची मदत घेतली जाणार आहे.​​​​​​

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती लवकरच आमिर खानसोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण आमिर लवकरच लडाख येथे करणार आहे. तर करीनाने तिच्या दुस-या बाळाच्या जन्मापूर्वी चित्रपटातील तिच्या दृश्यांचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...