आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेबोला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज:डिलिव्हरीनंतर दोन दिवसांनी आपल्या नवजात बाळासह घरी परतली करीना, पती सैफ आणि मुलगा तैमूर होते सोबत

एका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 फेब्रुवारी रोजी झाला बाळाचा जन्म

प्रसूतीनंतर दोन दिवसांनी अभिनेत्री करीना कपूरला मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सैफ अली खान मुलगा तैमुरसह त्यांना घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. रुग्णालय आणि घराबाहेरचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यात करीना आणि तिचे बाळ कारमधून घरी जाताना दिसत आहेत. कारच्या बाहेरुन क्लिक करण्यात आलेल्या छायाचित्र आणि व्हिडिओमध्ये सैफ आणि तैमूरचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. पण करीना आणि तिच्या नवजात बाळाची झलक स्पष्टपणे दिसत नाही.

21 फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिला

शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास करीनाला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तिच्या मुलाचा जन्म झाला. पत्रकारांना पाठवलेल्या निवेदनात सैफ अली खानने लिहिले होते की, 'आमच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित व निरोगी आहेत. हितचिंतकांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.'

सैफिना नव्या घरात शिफ्ट झाले आहेत

दुसर्‍या मुलाच्या जन्मापूर्वीच सैफिना म्हणजेच सैफ आणि करीना त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले होते. त्याचे हे घर खूप मोठे आहे. या घरात एक आलिशान लायब्ररी, स्विमिंग पूल आणि एक खास नर्सरी देखील तयार केली गेली आहे. जिथे तैमूर आपल्या लहान भावासोबत वेळ घालवू शकेल.

तैमूरसारखा दिसतो दुसरा मुलगा
करीनाच्या धाकट्या मुलाचे छायाचित्र अद्याप समोर आले नाही. चाहते बेबी बॉयच्या पहिल्या झलकची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, बेबोचा धाकटा मुलगा तैमूरसारखा दिसतो. ते म्हणाले, 'मला सर्व मुले एकसारखी दिसतात. पण आमच्या घरी सर्वजण बाळ तैमूरसारखे दिसत असल्याचे म्हणत आहेत.'