आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BoycottKareenaKhan होतोय ट्रेंड:माता सीतेच्या भूमिकेसाठी समोर आले करीनाचे नाव, संतापलेेले नेटकरी म्हणाले - ‘सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्री हवी’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या सविस्तर...

दिग्दर्शक अलौलिक देसाईंनी आपल्या आगामी 'सीता' या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी करीना कपूर खान हिला विचारणा केल्याचे वृत्त अलीकडेच आले होते. इतकेच नाही तर या भूमिकेसाठी करीनाने तब्बल 12 कोटी रुपये मानधन म्हणून मागितले असल्याचेही म्हटले जात आहे. मात्र अद्याप याविषयी अधिकृतरित्या काहीही समोर आलेले नाही. पण यावरुन करीना मात्र सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर करीनावर बहिष्कार घालण्याची मागणीही होऊ लागली आहे.

सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्रीच हवी, असे नेटकरी म्हणत आहेत. जर करीनाने माता सीतेची भूमिका साकारली तर तो हिंदू धर्म आणि माता सीतेचा अपमान होईल, असे काही नेटकरी म्हणत आहेत. काहींनी करीनाला बॉयकॉट करण्याची मागणी केली. त्यामुळे सोशल मीडियावर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसत आहे.

सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया..

चित्रपटात रावणाची भूमिका साकारु शकतो रणवीर
चित्रपटाचे लेखक के.व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, करीनाला या चित्रपटात काम करण्यासाठी अजूनपर्यंत विचारणाच करण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटातील रावणाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक अलौकिक देसाई यांनी रणवीर सिंहला अप्रोच केले आहे. रणवीरला भूमिका आवडली असल्याचेही सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...