आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद शमेना:सीता मातेच्या भूमिकेसाठी करीनाच्या नावाला विरोध वाढला, आता वादात बजरंग दलाची उडी, म्हणाले - चित्रपट झाला तर त्याला विरोध केला जाईल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंदू धर्मातील भूमिका मुस्लिमच का करतात?

आगामी 'सीता' हा चित्रपट अद्याप फ्लोअरवर आलेला नाही. मात्र आतापासूनच या चित्रपटाला तीव्र विरोध होऊ लागला आहे. या चित्रपटात करीना कपूर खान सीते मातेची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगू लागली आणि वादाला तोंड फुटले. यावरुन सुरु झालेला वाद अद्याप शमलेला नाही. त्यानंतर आता या वादत बजरंग दलानेही उडी घेतली आहे.

नागपूरमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी करिनाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे एक निवेदन दिले आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे निवेदन देताना हा चित्रपट तयार झाला तर त्याला मोठा विरोध केला जाईल असे म्हटले आहे. आपल्या निवेदनात त्यांनी करीना कपूरचे बिकिनी फोटो आणि ती अजमेर दरगाहला गेलेली असतानाचे फोटोही दिले आहेत.

हिंदू धर्मातील भूमिका मुस्लिमच का करतात?
बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने मीडियाशी बोलताना म्हटले, 'हिंदू समाजावर बॉलिवूडमध्ये वारंवार चित्रपट तयार केले जात आहेत. यात तांडव या वेब सीरिजमध्ये करीनाचा पती सैफ अली खानने काम केले होते. आता 'सीता' येत आहे ज्यात करीना कपूर काम करणार आहे. वारंवार हे मुस्लिम लोक हिंदू धर्मातील भूमिका का साकारतात. जे लोक हिंदूंना वाईट म्हणतात. आज आपण त्यांनाच मोठी रक्कम मानधन म्हणून देत आहोत. आमच्याच माध्यमातून हे कोट्यवधी रुपये कमावणार आहेत. आम्ही या चित्रपटाचा विरोध करत आहोत. जर हा चित्रपट तयार केला गेला तर त्याला विरोध केला जाईल. आज आम्ही यासंबंधी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.'

चित्रपटासाठी करीनाने मागितले 12 कोटी रुपये
अलौकिक देसाईंच्या या चित्रपटातील सीता मातेची भूमिका साकारण्यासाठी करीनाला विचारणा झाली असून त्यासाठी तिने बरीच मोठी रक्कम मानधन म्हणून मागितल्याचे बोलले जात आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर करीनाच्या विरोधात बहिष्काराची मागणी झाली होती. सीता मातेच्या भूमिकेसाठी करीनाने 12 कोटी रुपये मानधन मागितल्याचे बोलले जात होतं. करीनाच्या विरोधात सोशल मीडियावर #BoycottKareenaKhan ट्रेन्ड झाले होते.

चित्रपटात रावणाची भूमिका साकारु शकतो रणवीर
चित्रपटाचे लेखक के.व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, करीनाला या चित्रपटात काम करण्यासाठी अजूनपर्यंत विचारणाच करण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटातील रावणाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक अलौकिक देसाई यांनी रणवीर सिंहला अप्रोच केले आहे. रणवीरला भूमिका आवडली असल्याचेही सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...