आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे जेह:करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा धाकटा मुलगा झाला एक वर्षाचा, करीनाने मुलाचा अनसीन फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीनाने मुलाला दिल्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा धाकटा मुलगा जेह म्हणजेच जहांगीर अली खान आज 1 वर्षाचा झाला आहे. यानिमित्ताने करीनाने जेहचे एक अनसीन फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत करीनाने एक खास कॅप्शन लिहिले आहे. या फोटोत जेह त्याचा मोठा भाऊ तैमूरसोबत दिसतोय.

करीनाने मुलाला दिल्या शुभेच्छा
फोटो शेअर करत करीनाने लिहिले, 'दादा, माझ्यासाठी थांब मी आज एक वर्षांचा झालोय. चल आपण एकत्र हे जग फिरूया… अम्मा आपल्यासोबत असणारच आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जेह बाबा, माझे आयुष्य, माझा मुलगा,' असे कॅप्शन करीनाने दिले आहे.

चाहत्यांसोबतच सेलेब्सही या फोटोवर कमेंट करत जेहला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. करीनाची मैत्रीण अमृता अरोरा हिने कमेंट करत लिहिले की, “जेह बाबा”. यासोबतच तिने अनेक हार्ट इमोजीही शेअर केले आहेत. जेहची आत्या सबा पतौडीने लिहिले, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जेह जान."

सैफ आणि करीनाने मुलगा जेहला प्रसिद्धीपासून दूर ठेवतील

सैफ आणि करीनाने 16 ऑक्टोबर 2012 रोजी मुंबईत लग्न केले. त्यांचा मुलगा तैमूर अली खानचा जन्म 20 डिसेंबर 2016 रोजी झाला. 12 ऑगस्ट 2020 रोजी सारा अली खान (सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी) च्या 25 व्या वाढदिवशी, सैफ-करीनाने घोषणा केली की ते दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. त्यानंतर 21 फेब्रुवारीला मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये करीनाने दुसरा मुलगा जेहला जन्म दिला. तैमूरने मीडियाचे लक्ष वेधले असताना, सैफ आणि करीनाने त्यांचा दुसरा मुलगा जेहला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...