आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिली फोटो:धाकट्या भावासोबत खेळताना दिसला तैमूर, करीना कपूरने शेअर केला दुस-या मुलाचा फोटो पण चेहरा मात्र दिसू दिला नाही

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या छायाचित्रात करीना दिसत नाहीये.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने सोशल मीडियावर चाहत्यांना वीकेण्ड सरप्राईज दिले आहे. तिने आपल्या दुसर्‍या मुलाचा एक फोटो शेअर केला आहे, पण हा फोटो शेअर करताना करीनाने बाळाचा चेहरा मात्र दिसू दिला नाही.

या छायाचित्रात करीना दिसत नाहीये, पण सैफ अली खान आणि तैमूर चिमुकल्यासोबत खेळताना दिसत आहेत. करीनाने हा फोटो शेअर करत, 'माझा वीकेण्ड काहीसा असा असतो, तुमचा कसा असतो मित्रांनो?,' असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. सोबतच करीनाने एका बाळाचा इमोजी पेस्ट करत आपल्या मुलाचा चेहरा या फोटोत लपवला आहे. करीनाच्या या फोटोला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. अवघ्या 10 मिनिटांत 2 लाखांहून अधिक लाइक्स या फोटोला मिळाले आहेत.

यापूर्वी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने करीनाने आपल्या दुसर्‍या मुलासोबतचा पहिला फोटो शेअर केला होता. यावेळीदेखील करीनाने चाहत्यांची उत्सुकता ताणून धरत बाळाचा चेहरा दाखवला नव्हता. तिने बाळासोबतच ब्लॅक अँड व्हाइट फोटो यावेळी शेअर केला होता.

21 फेब्रुवारीला झाला बाळाचा जन्म
करीनाने यावर्षी 21 फेब्रुवारीला मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आपल्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. मात्र, अद्याप करीनाच्या धाकट्या मुलाचे नाव समोर आलेले नाही. चाहते बेबी बॉयचे नाव जाणून घेण्यासाठी आणि त्याचा चेहरा पाहण्यासाठी आतुर आहेत.

बाळाच्या जन्मापूर्वी सैफ-करीना नवीन घरात शिफ्ट झाले

दुसर्‍या मुलाचा जन्मापूर्वी सैफ आणि करीना त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले होते. त्यांचे हे घर खूप मोठे आहे. या घरात एक आलिशान लायब्ररी, स्विमिंग पूल आणि एक खास नर्सरी देखील तयार केली गेली आहे. जिथे तैमूर आपल्या लहान भावासोबत वेळ घालवू शकेल.

साराच्या वाढदिवशी केली होती प्रेग्नेंसीची घोषणा
सैफ आणि करीनाने 16 ऑक्टोबर 2012 रोजी मुंबईत लग्न केले होते. त्यांचा मोठा मुलगा तैमूर अली खानचा जन्म 20 डिसेंबर 2016 रोजी झाला होता. 12 ऑगस्ट 2020 रोजी सारा अली खान (सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची कन्या) च्या 25 व्या वाढदिवशी सैफ-करीनाने ते दुस-यांदा आईबाबा होणार असल्याचे जाहीर केले होते.

गरोदरपणातही काम थांबवले नव्हते
करीनाने प्रेग्नेंसीच्या काळात काम करणे थांबवले नव्हते. करीनाने गरोदर असताना 'लालसिंग चड्ढा' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. या चित्रपटात ती आमिर खानसोबत झळकणार असून चित्रपट यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...