आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Kareena Kapoor Khan Is Getting Many Offers To Make Her Digital Debut, Said The Condition Is That The Project Should Be Very Good And Exciting

करीनाचे ओटीटी पदार्पण:करीना कपूर खानला डिजिटल डेब्यूसाठी येत आहेत अनेक ऑफर्स, म्हणाली- अट एवढीच की प्रोजेक्ट खूप चांगला आणि रोमांचक असावा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेबो लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील दिसू शकते.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर लवकरच हंसल मेहताच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे अभिनयाबरोबरच करीना एकता कपूरसोबत मिळून या चित्रपटाची निर्मितीही करणार आहे. तत्पूर्वी ती आगामी लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर खान सोबत दिसणार आहे. या चित्रपटांव्यतिरिक्त, बेबो लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील दिसू शकते.

अलीकडेच, इंडिया टुडेशी झालेल्या संभाषणादरम्यान करीनाने सांगितले की, तिला ओटीटी प्लॅटफॉर्मकडून ब-याच ऑफर्स येत आहेत. पण सध्या ती एका उत्तम स्क्रिप्टच्या प्रतीक्षेत आहे. करीना डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यात उत्सुक आहे. पण इथे काम करण्यासाठी तिची एक अट देखील आहे. अट एवढीच की प्रोजेक्ट खूप चांगला आणि रोमांचक असावा, असे करीना म्हणाली.

अलीकडेच करीना कपूर खानने तिचे प्रेग्नेंसी बायबल हे पुस्तक लाँच केले आहे. ज्यात तिने तिचा गर्भधारणेचा प्रवास शेअर केला आहे. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर शीर्षकात बायबल हा शब्द वापरल्यामुळे करीना वादात सापडली होती.

याशिवाय करीना आणि सैफ यांचा दुसरा मुलगा जेहचे खरे नाव जहांगीर असल्याचे समोर आले आहे. तैमूरप्रमाणेच जहांगीर या नावावरुन सैफ-करीनाला बरेच ट्रोल केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...