आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे तैमूर:तैमूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करीना कपूर खानने शेअर केली खास पोस्ट, म्हणाली - 'तुला तुझ्या अम्माशिवाय जास्त कोणीच, कधीच प्रेम करू शकत नाही'

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज तैमूर चार वर्षांचा झाला आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा लाडका लेक तैमूर याचा आज (20 डिसेंबर) वाढदिवस असून तो चार वर्षांचा झाला आहे. यानिमित्ताने करीनाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. करीनाने तैमूरचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.

तैमूरविषयीचं प्रेम व्यक्त करताना करीना लिहिले, 'माझ्या मुला.. वयाच्या चौथ्या वर्षीच तुझ्याकडे असलेला दृढनिश्चय, आत्मसमर्पण आणि लक्ष केंद्रीत करण्याची वृत्ती पाहून मला फार आनंद होतो. माझ्या मेहनती मुलावर देवाचा सदैव आशीर्वाद असो. सोबतच बर्फवृष्टीचा आनंद घेण्याला, फुलांशी खेळायला, इकडे-तिकडे बागडायला आणि वाढदिवसाचा संपूर्ण केक खायला विसरू नकोस. तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुला आनंद देणाऱ्या गोष्टी करायला विसरू नकोस. तुला तुझ्या अम्माशिवाय जास्त कोणीच, कधीच प्रेम करू शकत नाही. टिम, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा”, अशा शब्दांत करीनाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

20 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 8 वाजून 49 मिनिटाला तैमूरचा जन्म झाला. आता तैमूर लवकरच दादा होणार आहे. करीना दुस-यांदा प्रेग्नेंट असून लवकरच ती आपल्या दुस-या बाळाला जन्म देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...