आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-या डिलिव्हरीच्या सात दिवसांनंतर:करीना कपूरने सोशल मीडियावर शेअर केला पहिला फोटो, म्हणाली - हॅलो मी तुम्हाला खूप मिस करतेय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीना स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लाइव्ह येऊन आपल्या बाळाचे नाव चाहत्यांना सांगणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने अलीकडेच दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्माच्या सात दिवसांनंतर करीनाने सोशल मीडियावर आपला पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती स्काय ब्लू कलरचा टॉप, हॅटमध्ये दिसत असून तिने गॉगलदेखील लावला आहे. करीनाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅलो, मी तुम्हाला खूप मिस करतेय.' मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात करीनाने 21 फेब्रुवारी रोजी बाळाला जन्म दिला. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाउन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. आई झाल्यानंतरचा पहिलाच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

सोशल मीडियावर बाळाचे नाव सांगणार करीना
रिपोर्ट्सनुसार, करीना आणि तिचा नवरा सैफ यांनी आपल्या बाळाचे नाव चाहत्यांना सांगण्यासाठी खास प्लानिंग केले आहे. ते तैमूरप्रमाणे आपल्या छोट्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करु इच्छित नाहीत. तर करीना स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लाइव्ह येऊन आपल्या बाळाचे नाव चाहत्यांना सांगणार आहे. करीना आणि सैफ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.

'लालसिंह चड्ढा'मध्ये झळकणार करीना
करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती अखेरची इरफान खान आणि राधिका मदन स्टारर 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात दिसली होती. तर 'लालसिंह चड्ढा' हा तिचा आगामी चित्रपट आहे. चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण करीनाने ती गर्भवती असताना पूर्ण केले होते. हा चित्रपट 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात आमिर खान मुख्य भूमिकेत असून अद्वैत चंदन हे दिग्दर्शक आहेत.

बातम्या आणखी आहेत...