आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना कपूरसोबत मुंबई विमानतळावर गैरवर्तन:सेल्फीसाठी चाहत्याचा खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न, दुसऱ्याने ओढली बॅग

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री करिना कपूर खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबई विमानतळावर करिना तिच्या कारमधून उतरताच फोटो, सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ दिसून आली. यावेळी एकाने खांद्यावर हात ठेवण्याचा केला प्रयत्न, तर एकाने बॅग ओढण्याचाही प्रयत्न केला.

बॉलिवूड पॅपाराझी व्हायरल भयानीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये करीना गर्दीत खूपच अस्वस्थ दिसत आहे. खरं तर, गर्दी टाळण्यासाठी करिना मागे वळाली होती, पण तेव्हा एका चाहत्याला तिच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या बॉडीगार्डने त्या चाहत्याला बाजूला केले. मात्र करीना यामुळे घाबरलेली दिसून आली.

यानंतर एका महिलेने करिनाचा हात आणि बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. यानतर करीनाने थेट बॅग सांभाळत विमानतळावर एन्ट्री घेतली. करिनाचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बेबोचे कौतूक

व्हिडिओ समोर येताच अनेक लोकांनी बेबो संयमानं वागताना दिसल्याने तिचे कौतुक केले आहे. तर चाहत्यांवर टीका केली आहे. एका यूजरने लिहिले की, चाहत्यांना कसे वागावे हे माहित असले पाहिजे. एकाने लिहिले की, करीना खरोखर घाबरली आहे. लोकांनी थोडेसे संवेदनशील असले पाहिजे. तेही मानवच आहेत. एका यूजरने लिहिले की, जर करीनाच्या या वागण्यावर प्रतिक्रिया दिली असती, तर लोकांनी म्हटले असते की, तिला खूप गर्व आहे, बॉयकॉट करा. पण या लोकांना बघा, ते कसे फ्लर्ट करत आहेत. तुम्ही चाहते असाल पण वागणूक तरी योग्य ठेवली पाहिजे.

करीना कपूर पांढरा शर्ट घालून हाफ स्वेटरमध्ये विमानतळावर पोहोचली. गडद चष्मा आणि बांधलेल्या केसांमध्ये करिनाचा लूक एकदम कुल दिसत होता.

बातम्या आणखी आहेत...