आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्फर्म:सैफ-करीनाकडे गुड न्यूज, दुस-यांदा आई  होणार आहे करीना कपूर खान; सैफच्या पीआर टीमकडून ऑफिशिअल अनाउंसमेंट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीना आणि सैफ दुस-यांदा आईबाबा होणार आहेत.

अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या घरी गुड न्यूज आहे. त्यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असून करीना आणि सैफ दुस-यांदा आईबाबा होणार आहेत. सैफ अली खानच्या पीआर टीमद्वारे करीनाच्या प्रेग्नेंसीविषयी अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

सैफच्या पीआर टीमने सैफ व करीनाच्या वतीने याबद्दलची माहिती दिली. “आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद”, असे सैफ आणि करीनाने म्हटले आहे

  • ब-याच काळापासून येत होत्या करीनाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या

करीनाने 2018 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, सैफ आणि ती 2020 मध्ये दुस-या बाळाचे प्लानिंग करणार आहेत. तर यावर करीनाचे वडील रणधीर कपूर म्हणाले होते, आशा करतो की ही बातमी खरी ठरो. मी खूप आनंदी असेल. दोन मुले असायला हवी, ज्यामुळे एकमेकांना कंपनी मिळते.

सैफ-करीनाचा मुलगा तैमूर यावर्षी डिसेंबर महिन्यात चार वर्षांचा होणार आहे. 2012 मध्ये सैफ आणि करीनाचे लग्न झाले होते. त्यानंतर चार वर्षांनी तैमूरचा जन्म झाला होता. सध्या सोशल मीडियावर करीना व सैफ अली खानवर शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे.

बातम्या आणखी आहेत...