आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली झलक:सैफच्या वाढदिवशी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली करीना कपूर खान, पहिल्यांदाच समोर आली प्रेग्नेंसीची छायाचित्रे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता प्रथमच करीना कपूर खान ‘बेबी बंप’ सोबत दिसली आहे.

अभिनेत्री करीना कपूर खान दुस-यांदा आई होणार आहे. अलीकडेच सैफच्या पीआर टीमने सैफ आणि करीनाच्या वतीने ही बातमी समोर आणली. आता प्रथमच करीना कपूर खान ‘बेबी बंप’ सोबत दिसली आहे.

सैफ अली खानने रविवारी वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. या खास निमित्ताने करीनाने वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला म्हणजे शनिवारी तिच्या घरी एक छोटी पार्टी आयोजित केली होती ज्यात करिश्मा कपूर, अमृता अरोरा, सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांनी हजेरी लावली होती. या सेलिब्रेशनची झलक करीनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केली आहे, ज्यामध्ये तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओंसह करीनाने लिहिले की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या आयुष्याची चमक'. पहिल्या व्हिडिओमध्ये, करीना आणि सैफ मजा करताना दिसत आहेत, तर दुसर्‍या स्लो मोशन व्हिडिओमध्ये सैफ रोमँटिक स्टाईलमध्ये करीनाच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे. या सेलिब्रेशनमध्ये करीनाने प्रिंटेंड ड्रेस परिधान केला आहे आणि सैफ गुलाबी रंगाच्या कुर्त्यामध्ये आहे.

सैफच्या पीआर टीमने 14 ऑगस्ट रोजी करीनाच्या गर्भवती असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. सैफ आणि करीनाने 2012 मध्ये रॉयल लग्न केले होते, त्यानंतर चार वर्षांनी तैमूरचा जन्म झाला. चार वर्षांनंतर सैफिना घरी त्यांच्या दुस-या बाळाचे आगमन होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...