आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हॅपी बर्थडे:40 वर्षांची झाली करीना कपूर खान, वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पोस्ट लिहून म्हणाली - 'हे बिग 40! आणखी बिग करू'; वाचा बेबोच्या इंट्रेस्टिंग गोष्टी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीनाने एका पोस्टमधून आपली मनातील इच्छा बोलून दाखवली आहे.

'होर दस्स, किनिया तारीफां चाहिदी ऐ तैनू' चित्रपट 'वीरे दी वेडिंग'चे हे गाणे या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री बेबो म्हणजेच करीना कपूरवर एकदम फिट बसते. आयुष्याच्या प्रत्येक फ्रंटवर सक्सेस, म्हणजे कौतुकच कौतुक. करीनाने आज वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या वाढदिवसाच्या काही तास आधी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपली मनातील इच्छा बोलून दाखवली आहे.

आपल्या वाढदिवसानिमित्त करीनाने इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट लिहिली असून त्यासह आपला एक सुंदर फोटो शेअर केला आहे. करीना म्हणाली, "मी वयाच्या चाळीशीत पदार्पण करत आहे. मला खूप प्रेम करायचे आहे, हसायचे आहे, माफ करायचे आहे, विसरायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रार्थना करायची आहे. मला ताकद देणाऱ्यांचे आभार मानायचे आहे आणि आज मी जशी आहे तशी महिला बनवणारे माझे अनुभव आणि विचार यांचीही मी आभारी आहे. त्यापैकी काही योग्य, काही अयोग्य, काही खूप चांगले आणि काही चांगलेही नव्हते. पण तरी, हे बिग 40! आणखी बिग करू."

करीनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी

  • नावाची कहाणी

करीनाचे आजोबा राज कपूर यांनी तिचे नाव 'सिद्दीमा' ठेवले होते. पण आई बबीताने आपल्या प्रेग्नन्सीदरम्यान वाचलेले एक पुस्तक 'कॅरेनिना' याने प्रेरित होऊन तिचे नाव करीना ठेवले.

  • 'हीरोइन' चा रेकॉर्ड...
  • चित्रपट 'हीरोइन' मध्ये करीनाने 38 डिजाइनर ड्रेसेज घातले होते. (एक रेकॉर्ड).
  • 5 खान कलाकार शाहरुख, सलमान, आमिर, सैफ अली आणि इमरान खान यांच्यासोबत काम केलेली एकमेव कलाकार आहे करीना.
  • यूनिव्हर्सल स्टूडियोजमध्ये शूटिंग ('कम्बख्त इश्क' चित्रपटासाठी) करणारी पहिली इंडियन अभिनेत्री करीना कपूरच आहे.
  • 3 वेळा (2008, 2013 आणि 2016 मध्ये) लाइफस्टाइल मॅगझिन वेर्वे (Verve) च्या लिस्टमध्ये देशातील मोस्ट पॉवरफुल वुमन म्हणून निवडली गेली आहे करीना.
  • ईस्टर्न आय मॅगझिनच्या लिस्टमध्ये करीना दोनवेळा 2011 आणि 2012 मध्ये इंडियाची सर्वात हॉट आणि एशियाची सर्वात सेक्सी महिला म्हणून निवडली गेली होती.
  • पीपल मॅगझिनने 2010 मध्ये तिला भारतातील सर्वात सुंदर महिला हा पुरस्कार दिला होता.
  • 6 फिल्मफेअर अवॉर्ड्स....

करीनाने आतापर्यंत 6 फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले आहेत. जे खालीलप्रमाणे आहेत....

  • 2001 - रिफ्यूजी - बेस्ट डेब्यू
  • 2004 - चमेली - स्पेशल जूरी
  • 2005 - देव - बेस्ट एक्ट्रेस (क्रिटिक्स)
  • 2007 - ओमकारा - बेस्ट एक्ट्रेस (क्रिटिक्स)
  • 2008 - जब वी मेट - बेस्ट एक्ट्रेस
  • 2011 - वी आर फैमिली - बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस

​​​​​​​

  • करीना एकमेव अभिनेत्री आहे जिला सीएनएनची 'हू मॅटर्ड मोस्ट इन इंडिया' या लिस्टमध्ये जागा मिळाली.
  • 3 पुस्तकांची को-रायटरदेखील आहे करीना.
  • 'देव' चित्रपटात करिनाने पहिल्यांदा गणेदेखील गायले होते.
  • शाहिद कपूरच्या म्हणण्यावर ती शाकाहारी बनली होती आणि आजही आहे.
  • 'चमेली' चित्रपटाच्या तयारीसाठी करीना अनेकदा रात्री मुंबईच्या रेड लाइट - एरियामध्ये जायची आणि सेक्स वकर्सचे हाव-भाव काळजीपूर्वक पाहायची.
  • 'फिदा' मध्ये आपल्या करिअर मध्ये पहिल्यांदा करीनाने निगेटिव्ह भूमिका साकारली होती.
  • करीना आपले आजोबा राजकपूर यांच्या निधनापासून होळी साजरी करत नाही.

तीन महत्वाच्या तारखा, तीन कथा...

डेब्यू : 30 जून 2000
करीना करिअरची सुरुवात 'कहो ना प्यार है' पासून करणार होती. पण तिथे ऋतिकला जास्त महत्व मिळत असलेले पाहून एका नातेवाईकाच्या सल्ल्याने नंतर तिने अभिषेक बच्चनच्या अपोजिट 'रेफ्यूजी'ने डेब्यू केला.

लग्न : 16 ऑक्टोबर 2012
सैफ-करीना 'टशन' चित्रपटाच्या दरम्यान जवळ आले. सैफने तिला दोनदा प्रपोज केले. दोन्ही वेळा पॅरिसमध्येच. पहिल्यांदा करीनाने नकार दिला पण दुसऱ्या प्रपोजलवर दोन दिवसांनंतर होकार दर्शविला.

मुलगा तैमूरचा जन्म : 20 डिसेंबर 2016
गर्भावस्थेतदेखील करीना सक्रिय होती. फॅशन शोज केले. तैमूरच्या जन्मानंतर 16 किलो वजन कमी करून ती पडद्यावर परतली.

फेव्हरेट अॅक्ट्रेसेस

  • नर्गिस, मीना कुमारी

फर्स्ट अॅक्टिंग टीचर

  • किशोर नमित कपूर

हॉबीज

  • घोडेस्वारी

बेस्ट फ्रेंड्स

  • अमृता अरोरा, मलायका अरोरा, ईशा देओल

फेव्हरेट बुक

  • द काइंड वर्द किलिंग