आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीत बेगम:करीना कपूर खानच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल, 'प्रेग्नेंसी बायबल' या पुस्तकामुळे धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लेखिका आणि प्रकाशक अडचणीत सापडले

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिचे नुकत्याच प्रकाशित झालेले पुस्तक 'प्रेग्नेंसी बायबल'मुळे वादाच्या भोवऱ्यात सापली आहे. या पुस्तकाच्या नावावरून ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोप तिच्यावर आहे. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रेसिडंट असलेले आशिष शिंदे यांनी या पुस्तकाच्या नावावरून करीनासह दोन जणांविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

लेखिका आणि प्रकाशक अडचणीत सापडले

आशिष शिंदे यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, 'पवित्र शब्द 'बायबल' हा पुस्तकाच्या नावात वापरण्यात आला आहे. ज्यामुळे ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.' 'प्रेग्नेंसी बायबल'ची लेखिका करीना कपूर आणि अदिती शाह भीमजानी आहे. तर हे पुस्तक जगरनॉट बुक्सने प्रकाशित केले आहे.

मुंबईतही दाखल होऊ शकते तक्रार
दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले की, आमच्याकडे याबाबत तक्रार आली आहे. मात्र एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. कारण ही घटना इथली (बीड) नाही. त्यामुळे आम्ही शिंदे यांना मुंबईमध्ये जाऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.

करीनाने 'प्रेग्नेंसी बायबल'ला म्हटले आपले तिसरे बाळ
करिनाचे 'प्रेग्नेंसी बायबल' हे पुस्तक 9 जुलै रोजी प्रकाशित झाले. हे पुस्तक म्हणजे आपले तिसरे बाळ असल्याचे तिने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...