आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकरीना कपूरने सीतेची भूमिका साकारण्यासाठी 12 कोटी रुपये मानधन मागितल्याचे वृत्त काही महिन्यांपूर्वी आले होते. आता यावर करीनाने आपले मौन सोडले आहे. एका मुलाखतीत करीनाने स्पष्ट केले की, तिला कधीही या भूमिकेची ऑफर देण्यात आली नव्हती.
सीतेची भूमिका ऑफर झाल्याबाबत करिनाने दिली प्रतिक्रिया
झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, "मला या चित्रपटाची ऑफर कधीच देण्यात आली नव्हती, त्यामुळे मला या श्रेणीत का ठेवण्यात आले आहे हे मला माहीत नाही. या चित्रपटासाठी मी कधीच निवडले गेले नव्हते. या सर्व रचल्या गेलेल्या गोष्टी आहेत. दररोज लोक काहीतरी घडवून आणण्यासाठी काहीतरी शोधत असतात आणि त्यातूनच अशा बातम्यांचा जन्म होत असतो. हे सर्व कुठून येते हे मला माहित नाही. आजच्या काळात 100 प्रकारचे मीडिया प्लॅटफॉर्म आहेत आणि खूप गोष्टी सांगितल्या जातात, त्यामुळे आपण आपले काम करावे की लोकांना स्पष्टीकरण देत बसावे?," असा प्रश्न करीनाने विचारला.
सोशल मीडियावरील आपल्या इमेजबद्दल झाली व्यक्त
सोशल मीडियावरील आपल्या प्रतिमेबद्दल बोलताना करीना म्हणाली, "मी एक ब्रँड नाही. मला वाटते की लोक मला यासाठी पसंत करतात, कारण मी नेहमीच रिअल राहण्याचा प्रयत्न करते. माझ्याकडे 5 एजन्सी, 4 पीआर लोक आणि 3 मॅनेजर नाहीत, जे मला सांगतील की, मी काय करावे आणि काय करु नये. मी हे सर्व करू शकत नाही कारण माझ्याकडे वेळ नाही. माझी दोन मुले, कुटुंब आणि बरेच काही आहेत. माझे मित्र आहेत. माझे एक आयुष्य आहे, माझ्याकडे हे सर्व करण्यासाठी वेळ नाही," असे करीना म्हणाली.
कामासाठी आपले सर्वोत्तम देते करीना
करीना पुढे म्हणाली, "माझ्या चाहत्यांशी प्रामाणिक राहणे, चांगले काम करणे हे माझे काम आहे. मी माझ्या कामात माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करते आणि नंतर लवकर घरी पोहोचते, जेणेकरून मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकेन," असे करीना सांगते.
'लाल सिंग चड्ढा' आहे करीनाचा आगामी चित्रपट
करिनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री सध्या तिचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर रुपा हे करीनाच्या पात्राचे नाव आहे. मोना सिंग या चित्रपटात आमिरच्या आईची भूमिका साकारत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.