आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल सिंग चड्ढा:करीना कपूर म्हणाली -  चित्रपटातील आमिर खान सोबतच्या एका रोमँटिक गाण्याचा जेह देखील भाग होता

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीना म्हणाली, प्रॅक्टिकली जेह 'लाल सिंग चड्ढा'मध्ये आहे

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करीना दुस-यांदा प्रेग्नेंट होती. प्रेग्नेंसीदरम्यान चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव अलीकडेच एका मुलाखतीत करीनाने सांगितला आहे.

जेव्हा करीना दुसऱ्यांदा प्रेग्नंट होती तेव्हा ती ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. त्यामुळे धाकटा मुलगा जेह देखील या चित्रपटाचा भाग असल्याचे करीनाने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. करीनाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दुसरा मुलगा जेह (जहांगीर) ला जन्म दिला.

प्रेग्नेंसीच्या काळात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पतौडीहून हरियाणाला जात असे करीना
करीनाने सांगितले, 'आम्ही कम्फर्टेबल झोनमध्ये शूट केले होते. चित्रीकरणासाठी मी पतौडी पॅलेस ते हरियाणा प्रवास करत असे. अशाप्रकारे दररोज मी कारने दीड तास प्रवास करत असे. आम्ही चित्रपटाचे जास्तीत जास्त शूटिंग हे रात्रीच्या वेळेत केले होते. यावेळी सैफ आणि तैमूर कायम माझ्यासोबत असायचे. मी सैफला सेटवर सोबत येण्याची विनंती केली होती, जेणेकरुन तैमूरला सेटवर कम्फर्टेबल वाटावे.'

चित्रीकरणासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता
करीनाने पुढे सांगितले, 'चित्रीकरण सुरु करण्यापूर्वी मी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्यांनी सतत हात धुवत राहणे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे, अशा सूचना केल्या होत्या. दिवसभर भरपूर झोप घेतल्यानंतरच रात्री काम करावे, असेही डॉक्टरांनी मला सांगितले होते.'

करीना म्हणाली, प्रॅक्टिकली जेह 'लाल सिंग चड्ढा'मध्ये आहे

अप्रत्यक्षपणे जेह देखील चित्रपटात दिसणार असल्याचे करीनाने म्हटले आहे. चित्रपटात आमिर आणि करीनाचे एक रोमँटिक गाणे आहे. या गाण्याचा जेह देखील भाग होता. करीना म्हणाली, ‘प्रॅक्टिकली पाहायला गेलो तर माझा मुलगा जेह लाल सिंग चड्ढा चित्रपटाचा भाग होता. तो माझ्या आणि आमिरच्या एका गाण्याचा भाग आहे.’ 'लाल सिंग चड्ढा' हा 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...