आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान हे बी-टाऊनमधील सर्वात आवडते जोडपे आहेत. प्रत्येक वेळी करीना-सैफ एकत्र आले की सोशल मीडियावर चर्चा सुरु होते. सैफ आणि करिना कपल गोल सेट करत असतात असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. करीना कपूर आणि सैफ अली खान नुकतेच एकत्र दिसले. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. करीना आणि सैफ पार्टीतून परतत होते, तेव्हा बिल्डिंगबाहेर रात्री पापाराझींनी गर्दी केली होती. यावेळी फोटो काढताना सैफ पापाराझींवर भडकल्याचे दिसून आले.
सैफ आणि करिना कपूर खान हे मलायका अरोराच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीतून रात्री उशीरा घरी परतले. यावेळी पापाराझी त्यांचे फोटो क्लिक करण्यासाठी गर्दी केली. अगदी बिल्डिंगच्या दरवाज्यात प्रवेश करेपर्यंत पापाराझी फोटो क्लिक करत होते. यावेळी सैफ फडकला. एक काम किजीए, हमारे बेडरूम में आ जाईए..., असे तो म्हणाला. यावेळी करिनाला हसू आवरले नाही.
व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स संतापले
हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर युजर्स आपल्या तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'फालतू का अॅटिट्यूड'. तर तिथे दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'त्यांच्या मागे धावण्याची काय गरज आहे'.
'तैमूरला फोटो काढायला आवडत नाही, तो 'नो पिक्चर प्लीज' म्हणणे देखील शिकला आहे'
सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूरचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एअरपोर्ट, प्ले स्कूल पासून ते सैफ-करिनाच्या घराच्या बाहेरसुद्धा फोटोग्राफर्स एका फोटोसाठी त्याची वाट पाहात तासंतास उभे राहतात. पण सैफनुसार, त्याच्या मुलाला आता फोटो काढून घेणे आवडत नाही आणि तो यासाठी नकार देणेही शिकला आहे. त्याने हा खुलासा एका मुलाखतीमध्ये केला. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.