आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवमध्ये सुटीचा आनंद घेत आहे अभिनेत्री:करीना कपूरने मुलगा जेहसोबतचा नवीन फोटो केला शेअर,  लिहिले - लाइट्स, कॅमेरा, नॅप टाइम

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीनाने यापूर्वीही शेअर केले होते फोटो

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने अलीकडेच धाकटा मुलगा जेहसोबताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने हा फोटो स्टोरीवर ठेवला असून चिमुकला जेह तिच्या कडेवर दिसतोय. तिने फोटोवर लिहिले, "लाइट्स, कॅमेरा, नॅप टाइम". सध्या करीना आपल्या कुटुंबासह मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. करीनाने मालदीव येथे तिचा पती पती सैफ अली खानच्या 51 व्या वाढदिवस आपल्या दोन्ही मुलांसह साजरा केला.

करीनाने यापूर्वीही शेअर केले होते फोटो
करीनाने यापूर्वी मालदीवमधून फोटो शेअर करत सैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. "हॅपी बर्थडे टू लव्ह ऑफ माय लाइफ. मला अनंतकाळ तुझ्याबरोबर राहायचे आहे," असे कॅप्शन करीनाने फोटोसह दिले होते. करीनाने शेअर केलेल्या पहिल्या फोटो सैफ, करीना, तैमूर, जेह (जहांगीर) हे चौघेजण दिसत आहे. तर एका फोटोत सैफ आणि करीना स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत. जेह म्हणजेच करीनाचा लहान मुलगा जहांगीर याची ही पहिलीच परदेशची यात्रा आहे.

करीना म्हणाली, प्रॅक्टिकली जेह 'लाल सिंग चड्ढा'मध्ये आहे
करीना लवकरच आमिर खानसोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करीना गर्भवती होती. प्रेग्नेंसीत शूटिंग करण्याच्या अनुभवाविषयी करीनाने सांगितले होते, 'आम्ही कम्फर्टेबल झोनमध्ये शूट केले होते. चित्रीकरणासाठी मी पतौडी पॅलेस ते हरियाणा प्रवास करत असे. अशाप्रकारे दररोज मी कारने दीड तास प्रवास करत असे. आम्ही चित्रपटाचे जास्तीत जास्त शूटिंग हे रात्रीच्या वेळेत केले होते. यावेळी सैफ आणि तैमूर कायम माझ्यासोबत असायचे. मी सैफला सेटवर सोबत येण्याची विनंती केली होती, जेणेकरुन तैमूरला सेटवर कम्फर्टेबल वाटावे.'

अप्रत्यक्षपणे जेह देखील चित्रपटात दिसणार असल्याचे करीनाने म्हटले आहे. चित्रपटात आमिर आणि करीनाचे एक रोमँटिक गाणे आहे. या गाण्याचा जेह देखील भाग होता. करीना म्हणाली, ‘प्रॅक्टिकली पाहायला गेलो तर माझा मुलगा जेह लाल सिंग चड्ढा चित्रपटाचा भाग होता. तो माझ्या आणि आमिरच्या एका गाण्याचा भाग आहे.’ 'लाल सिंग चड्ढा' हा 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...