आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय महिला दिन:करीना कपूर खानने दुसर्‍या मुलाबरोबरचे पहिले छायाचित्र केले शेअर, म्हणाली- 'असे काहीही नाही जे महिलांना शक्य नाही'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 फेब्रुवारी रोजी झाला दुस-या मुलाचा जन्म

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री करीना कपूर खानने चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. तिने आपल्या दुसर्‍या बाळासोबतचे पहिले छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. करीनाने शेअर केलेल्या या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट सेल्फीमध्ये तिच्या मुलाचा चेहरा दिसत नाहीये. तो आपल्या आईच्या खांद्यावर डोके ठेवून झोपलेला दिसतोय.

करीनाने या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले, 'असे काहीही नाही जे महिलांना शक्य नाही, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.' करीनाच्या या फोटोवर तिची नणंद सबा अली खानने लव्ह यू, अशी कमेंट दिली आहे.

21 फेब्रुवारी रोजी झाला दुस-या मुलाचा जन्म
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात करीनाने 21 फेब्रुवारी रोजी आपल्या दुस-या बाळाला जन्म दिला. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाउन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. आता सर्व चाहत्यांना बाळाचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता आहे. दरम्यान सैफ आणि करीना आपल्या बाळाच्या व्हर्च्युअल इंट्रोडक्शनची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

सोशल मीडियावर बाळाचे नाव सांगणार करीना
रिपोर्ट्सनुसार, करीना आणि तिचा नवरा सैफ यांनी आपल्या बाळाचे नाव चाहत्यांना सांगण्यासाठी खास प्लानिंग केले आहे. ते तैमूरप्रमाणे आपल्या छोट्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करु इच्छित नाहीत. तर करीना स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लाइव्ह येऊन आपल्या बाळाचे नाव चाहत्यांना सांगणार आहे. करीना आणि सैफ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.

अद्याप चिमुकल्याचे नाव समोर आले नाही
बातमीनुसार, 25 फेब्रुवारी रोजी करीना आणि सैफने त्यांच्या नवीन घरी बाळाच्या नामकरणाचा एक छोटेखानी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चिमुकल्या पतौडीचे बारसे झाले. मात्र, अद्याप बाळाचे नाव समोर आलेले नाही.

'लालसिंह चड्ढा'मध्ये झळकणार करीना
करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती अखेरची इरफान खान आणि राधिका मदन स्टारर 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात दिसली होती. तर 'लालसिंह चड्ढा' हा तिचा आगामी चित्रपट आहे. चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण करीनाने ती गर्भवती असताना पूर्ण केले होते. हा चित्रपट 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात आमिर खान मुख्य भूमिकेत असून अद्वैत चंदन हे दिग्दर्शक आहेत.

बातम्या आणखी आहेत...