आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अम्फन चक्रीवादळ:करीनाने बंगालच्या परिस्थितीबद्दल व्यक्त केली चिंता, फोटो शेअर करुन म्हणाली - 'आपण या सगळ्याचा विचार केला पाहिजे'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चक्रीवादळात सुमारे 72 जणांचा जीव गेला आहे.

पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अम्फन महाचक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे 72 लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोकांना धोक्याच्या ठिकाणांहून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  दरम्यान, बंगालची ही वाताहत बघून अभिनेत्री करीना कपूर खाननेही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

शुक्रवारी करीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पश्चिम बंगाल आणि ओडिशाची काही छायाचित्रे शेअर केली असून यात तेथील जनजीवन अम्फन वादळामुळे कसे विस्कळीत झाले हे दिसून येतंय. 'आपण या सगळ्याचा विचार केला पाहिजे', असे कॅप्शन तिने दिले.  

करीनाचे जी छायाचित्रे शेअर केली आहेत, त्यामध्ये रस्त्यावर प्रचंड पाणी साचले दिसून येत आहे. अनेक जण डोक्यावर सामान वाहून नेत आहेत. तर काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत, अनेक माणसे आणि प्राणी जखमी झाले आहेत. या चक्रीवादळात सुमारे 72 जणांचा जीव गेला, तर बरीच पिकेही पूर्णपणे नष्ट झाली आहेत. करीनाशिवाय अनुष्का शर्मा, विक्की कौशल आणि कियारा अडवाणी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी बंगालसाठी प्रार्थना केली आहे.

बातम्या आणखी आहेत...