आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थडे स्पेशल:'या' कारणामुळे रात्ररात्र रडायची करिश्मा, धर्मेंद्र यांनी बॉबी देओलच्या डेब्यू फिल्ममधून दिला होचा डच्चू 

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाईट ड्रेसिंग सेन्समुळे उडायची करिश्माची खिल्ली, लोक म्हणायचे लेडी रणधीर कपूर

अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 46 वर्षे पूर्ण केली आहेत. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबिता यांची कन्या करिश्माने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. 1991 मध्ये आलेल्या 'प्रेम कैदी' या चित्रपटातून ती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली होती. हरीश कुमार हा अभिनेता तिच्यासोबत या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. दुर्दैवाने करिश्माचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर एकामागून एक करिश्माचे तब्बल 12 चित्रपट फ्लॉपच्या यादीत जमा झाला होते.

चित्रपटसृष्टीतील अपयशामुळे खचून करिश्मा रात्ररात्र रडायची. याचकाळात धर्मेंद्र त्यांचा धाकटा मुलगा बॉबी देओलला लाँच करणार होते. करिश्मासोबत बॉबीला लाँच करण्याचा धर्मेंद्र यांचा विचार होता. पण करिश्माचे चित्रपट फ्लॉप होत असल्याने त्यांनी त्यांचा निर्णय बदलला आणि बॉबीला ट्विंकल खन्नासोबत लाँच केले.

  • वाईट ड्रेसिंग सेन्समुळे उडायची करिश्माची खिल्ली, लोक म्हणायचे लेडी रणधीर कपूर

करिश्मा कपूरने जेव्हा इंडस्ट्रीत पाऊल ठेवले, त्याकाळात तिचा ड्रेसिंग सेन्स अतिशय वाईट होता. अनेकदा मीडियात तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि मेकअपवरुन तिची खिल्ली उडवली जायची. काही लोक तर तिला तिचे वडील रणधीर कपूर यांच्या नावावरुन चिडवायचे आणि तिला लेडी रणधीर कपूर म्हणायचे.

चित्रपटसृष्टीतील पदार्पणाच्या चार वर्षांनंतर करिश्माला यशाची चव चाखायला मिळाली. 1994 मध्ये आलेल्या 'राजा बाबू'  या चित्रपटाने करिश्माला स्टार बनवले होते. या चित्रपटात अभिनेता गोविंदासोबत तिची जोडी जमली होती. 'राजा बाबू' हिट झाल्यानंतर दिग्दर्शकांची नजर करिश्मावर पडली.  

1996 मध्ये आलेल्या 'राजा हिन्दुस्तानी'ने करिश्माला सुपरस्टार पद बहाल केले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 1997 मध्ये आलेल्या 'दिल तो पागल है'साठी करिश्माला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

  • 2003 मध्ये लग्न, 2016 मध्ये घटस्फोट

अभिषेक बच्चनसोबत करिश्माचे लग्न ठरले होते. दोघांचा साखरपुडादेखील झाला होता. मात्र अभिषेकसोबत लग्न मोडल्यानंतर काही महिन्यांतच करिश्माने घटस्फोटित संजय कपूरसोबत लग्न थाटले. पण करिश्मा आणि संजयचे नाते काही वर्षेच टिकले. दोघांचा घटस्फोट झाला आहे. संजय कपूरने आरोप लावला होता, की करिश्माने पैशांसाठी अभिषेक बच्चनशी लग्न मोडून माझ्याशी लग्न केले होते. करिश्माला समायरा आणि कियान राज ही मुले आहेत. संजय कपूरपासून विभक्त झाल्यानंतर करिश्मा आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतेय. अधूनमधून ती वेब सीरिजमध्ये दिसत असते. सध्या करिश्मा बिझनेसमन संदीप तोषनीवालला डेट करत असल्याची चर्चा आहे.  दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत.  

  • हे आहेत करिश्माचे 13 फ्लॉप चित्रपट

करिश्मा कपूरने 'प्रेम कैदी' (1991), 'पुलिस ऑफिसर' (1992), 'जागृति' (1992), 'निश्चय' (1992), 'सपने साजन के' (1992), 'दीदार' (1992), 'जिगर' (1992), 'अनाडी' (1993), 'मुकाबला' (1993), 'संग्राम' (1993), 'शक्तिमान' (1993), 'धनवान' (1993), 'प्रेम शक्ति' (1994) हे एकामागून एक 13 फ्लॉप चित्रपट केले होते.

  • या हिट चित्रपटांमध्ये झळकली आहे करिश्मा 

करिश्माने 'सुहाग' (1994), 'गोपी किशन' (1994), 'कुली नं. वन' (1995), 'जीत' (1996), 'राजा हिन्दुस्तानी' (1996), 'जुड़वां' (1997), 'हीरो नं. वन' (1997), 'दिल तो पागल है' (1997), 'बीवी नं. वन' (1999), 'हम साथ-साथ हैं' (1999) यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...