आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन:एनसीबीने दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्माच्या आईसह क्वान कंपनीच्या काही अधिका-यांना समन्स बजावले, ड्रग्ज जप्त झाल्यापासून आहे बेपत्ता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोनदा समन्स बजावून देखील करिश्मा चौकशीसाठी एजन्सीसमोर हजर झाली नाही.
  • करिश्मा प्रकाश आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यातील ड्रग्जविषयीचे चॅट्स समोर आले होते, ज्यात दोघी जणी 'माल'संदर्भात बोलत होत्या.

अभिनेत्री दीपिका पदुकोणची टॅलेंट मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरातून ड्रग्ज जप्त झाल्यापासून ती बेपत्ता आहे. एनसीबीने तिला यासंदर्भात दोनदा समन्स बजावले, मात्र ती चौकशीसाठी हजर झाली नाही. आता एनसीबीने तिची आई मिताक्षरा पुरोहित यांना समन्स बजावले आहे. करिश्माची आई गोरेगाव येथे राहते. चौकशीसाठी गैरहजर राहिल्यानंतर गुरुवारी तिच्याविरोधात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या मंगळवारी तिच्या घरातून 1.8 ग्रॅम बंदी असलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले. यानंतर, करिश्माला बुधवारी एनसीबीने चौकशीसाठी बोलावले. दिवसभर एनसीबीच्या अधिका-यांनी तिची वाट पाहिली. पण ती हजर झाली नाही, यानंतर अटक टाळण्यासाठी करिश्मा प्रकाशने शनिवारी एनडीपीएस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.

  • एनसीबीने क्वानमधील काही अधिका-यांनाही चौकशीसाठी बोलावले

करिश्माच्या आईव्यतिरिक्त एनसीबीने क्वान टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीच्या काही अधिका-यांनाही समन्स बजावले आहे. करिश्मा या कंपनीत काम करते. ही कंपनीने अनेक मोठ्या कलाकारांसाठी जाहिरातींपासून ते चित्रपटांपर्यंत त्यांच्या प्रोफेशनल कामाचे व्यवस्थापन करते. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर जया साहा ही देखील याच कंपनीत काम करते. जया साहाची एनसीबीसह अनेक तपास यंत्रणांनी चौकशी केली आहे.

  • घरात मिळाल्या होत्या सीबीडी ऑइलच्या तीन बॉटल

करिश्माच्या घरातून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज अत्यंत अल्प प्रमाणात असले तरी, यासाठी तिला अटक केली जाऊ शकते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्माच्या या घरातून सीबीडी तेलाच्या तीन बॉटलही जप्त केल्या आहेत. दोषी ठरल्यास तिला एक वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा किंवा दहा हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते.

  • रेड दरम्यान करिश्मा घरी नव्हती

एनसीबीने मंगळवारी करिश्माच्या घरी छापा टाकला. मात्र या कारवाईच्या वेळी करिश्मा घरी नव्हती. त्यामुळे एनसीबीने समन्स तिच्या घराबाहेर चिकटवले होते. करिश्मा ड्रग्ज पॅडलरच्या सतत संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. करिश्माच्या ज्या घरावर कारवाई झाली ती तिचे दुसरे घर आहे. या घरी तिचे येणे-जाणे असते, असे सांगितले जाते. मात्र तिच्या वकीलांनी ती येथे राहात असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. यापूर्वी एनसीबीने 2 वेळा करिश्माची चौकशी केली होती. एकदा करिश्माला दीपिका पदुकोणसमोर प्रश्नोत्तरे केली गेली.

  • दीपिका आणि करिश्मा यांचे ड्रग्ज चॅट समोर आले होते

दीपिका आणि करिश्माचे ड्रग्ज चॅट समोर आले होते काही दिवसांपूर्वी दीपिका आणि करिश्मा यांच्यातील ड्रग्जबाबतचे संभाषण समोर आले होते. दीपिका आणि करिश्मा यांच्यातील हे संभाषण 28 ऑक्टोबर 2017 रोजी झाले होते. करिश्माशी झालेल्या संभाषणात दीपिकाने 'हॅश' आणि 'वीड' सारखे शब्द वापरले होते. बंदी असलेल्या हॅशला ड्रग्जच्या भाषेत चरस म्हटले जाते.

या दोघींमधील संभाषणात 'हॅश' आणि 'वीड'चा वापर कुणासाठी केला गेला, हे स्पष्ट झाले नाही. यात ड्रग्जच्या प्रमाणाचाही उल्लेख नाही. मात्र दीपिकाच्या अडचणीत भर घालण्यासाठी हे व्हॉट्सअॅप चॅट्स पुरेसे आहेत.