आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिश्मा-वरूणचे लग्न:करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेराच्या लग्नाचे फंक्शन सुरू, हळदीचे फोटो आले समोर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा दोघांच्या हळदीची छायाचित्रे...

टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांचे 5 फेब्रुवारीला लग्न आहे. ३ फेब्रुवारीपासून या जोडप्याच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्यांच्या हळदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत आहे. करिश्मा आणि वरुण गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करत आहेत. कोविड प्रोटोकॉलमुळे त्यांनी आपल्या लग्नात निवडक मित्रांनाच आमंत्रित केले आहे. बघा दोघांच्या हळदीची छायाचित्रे...

कोण आहे वरुण बंगेरा?
वरुण बंगेरा हा मुंबईचा रहिवासी असून तो व्यावसायिक आहे. तो व्हीबी क्रॉप नावाच्या कंपनीचा डायरेक्टर आहे. वरुणचे शालेय शिक्षण कॅनडातील ओटावा विद्यापीठातून झाले. वरुण करिश्माची पहिली भेट दोघांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. जवळपास दीड वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी मागील वर्षी दुबईमध्ये एका खासगी कार्यक्रमात साखरपुडा केला होता.

बातम्या आणखी आहेत...