आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रेम कैदी'ची 30 वर्षे:करिश्मा कपूरच्या डेब्यू चित्रपटाचा नायक असलेल्या हरीश कुमार चित्रपटसृष्टीत निर्माण करु शकला नाही स्वतःची वेगळी ओळख, हे आहे कारण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरीश कुमार 90 च्या दशकात अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये सह-अभिनेता म्हणून दिसला होता.

करिश्मा कपूरचा डेब्यू चित्रपट 'प्रेम कैदी'च्या रिलीजला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1991 मध्ये आलेल्या या चित्रपटानंतर करिश्माने बॉलिवूडमध्ये लांबचा पल्ला गाठला. मात्र तिच्यासोबत झळकलेला अभिनेता हरीश कुमार पडद्यामागे गेला.

हरीश कुमार 90 च्या दशकात अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये सह-अभिनेता म्हणून दिसला होता. पण त्यानंतर हळूहळू तो इंडस्ट्रीतून गायब झाला. हरीशने बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. इतकेच नाही तर हरीश हिंदी, तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणारा एकमेव अभिनेता असल्याचे म्हटले जाते. त्याने बॉलिवूड आणि प्रादेशिक भाषांमध्ये सुमारे 300 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

​​​

'प्रेम कैदी' मधील एका दृश्यात करिश्मा कपूर सोबत हरीश
'प्रेम कैदी' मधील एका दृश्यात करिश्मा कपूर सोबत हरीश

हरीश कुमारने वयाच्या 15 व्या वर्षी मुख्य अभिनेता म्हणून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. त्याचा पहिला चित्रपट 'डेझी' हा मल्याळम चित्रपट होता. प्रेम कैदी (1991) या हिंदी चित्रपटात लीड अॅक्टर म्हणून दिसण्यापूर्वी हरीशने 'संसार' (1987) आणि 'जीवन धारा' (1982) सारख्या काही बॉलिवूड चित्रपटात काम केले होते.

नाना पाटेकर आणि गोविंदासारख्या कलाकारांसोबत केले काम
हरीशने नाना पाटेकर यांच्याबरोबर 'तिरंगा' (1992) आणि गोविंदासह 'कुली नंबर 1' (1995) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता 2001 मध्ये आलेल्या 'इंतकाम' या चित्रपटानंतर मोठ्या पडद्यावरुन गायब झाला. त्याने गोविंदा स्टारर 'नॉटी अ‍ॅट 40' (2011) मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चित्रपट फ्लॉप ठरला. 2012 मध्ये आलेल्या 'चार दिन की चांदनी' या चित्रपटात तो अखेर दिसला होता. हा चित्रपटही फ्लॉपच्या यादीत गणला जातो.

लठ्ठपणामुळे हरीशचे करिअर उद्धवस्त झाले.
लठ्ठपणामुळे हरीशचे करिअर उद्धवस्त झाले.

या कारणामुळे इंडस्ट्रीत टिकू शकला नाही हरीश कुमार
असे म्हणतात की, हरीश कुमार लठ्ठपणामुळे इंडस्ट्रीतून बाहेर झाला. लठ्ठपणामुळे त्याचा लुक पूर्णपणे बदलला. यामुळे त्याला काम मिळणे बंद झाले. बॉलिवूडनंतर हळूहळू त्याला प्रादेशिक चित्रपटांमध्येही टाळले जाऊ लागले. त्याने 1995 मध्ये संगीता चुगशी लग्न केले आणि तो मुंबईत वास्तव्याला आहे.

बातम्या आणखी आहेत...