आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारक्षित शेट्टी स्टारर चित्रपट '777 चार्ली' हा चित्रपट 10 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. '777 चार्ली' हा चित्रपट एक माणूस आणि त्याचा पाळीवर कुत्रा यांच्यातील नात्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची विशेष हजेरी होती, विशेष म्हणजे चित्रपट पाहून ते खूप भावूक झाले. संपूर्ण चित्रपटात त्यांचे डोळे पाणावले होते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कुत्र्यांचे प्रेम हे बिनशर्त प्रेम असते : मुख्यमंत्री बोम्मई
'777 चार्ली'ची कहाणी पाहून बसवराज बोम्मई यांना त्यांच्या पाळीव कुत्र्याची आठवण झाली. गेल्या वर्षी त्यांच्या कुत्र्याचे निधन झाले होते, त्यामुळे ते संपूर्ण चित्रपट बघताना भावूक झालेले दिसले. व्हिडिओशिवाय काही फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये त्यांचे डोळे पाणावलेले दिसत आहेत.
चित्रपट पाहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, श्वानांवर अनेक चित्रपट बनले आहेत. पण या चित्रपटात प्राणी आणि भावना यांच्यात कमालीचा ताळमेळ आहे. श्वान त्यांच्या डोळ्यांद्वारे त्यांच्या भावना व्यक्त करतात. 777 चार्ली हा चित्रपट खूप चांगला आहे आणि सर्वांनी पाहावा. मी बिनशर्त प्रेमाबद्दल बोलतो आणि श्वानांचे प्रेम बिनशर्त असते.
या चित्रपटाने केला 24 कोटींचा व्यवसाय
'777 चार्ली'चे दिग्दर्शन किरणराज यांनी केले आहे. या चित्रपटात रक्षित शेट्टीशिवाय संगीता शृंगेरी, राज बी शेट्टी, दानिश सैत आणि बॉबी सिन्हा मुख्य भूमिकेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने आतापर्यंत सर्व भाषांमध्ये सुमारे 24 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. बॉक्स ऑफिसवर '777 चार्ली'ने पहिल्या दिवशी 6.27 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.87 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 10.01 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.