आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सँडलवूड ड्रग्ज प्रकरण:रागिनी द्विवेदी आणि संजना गलरानी यांची जामीन याचिका पुन्हा फेटाळली, दोन महिन्यांपासून तुरूंगात आहेत या दोन्ही अभिनेत्री

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या या प्रकरणात चौकशी सुरु आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री संजना गलरानी आणि रागिनी द्विवेदी यांची जामीन याचिका फेटाळून लावली. संजनाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. तिच्यावर सँडलवूड पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. ती मागील 8 सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहे, तर रागिनीला 4 सप्टेंबरला पोलिसांनी अटक केली होती. सध्या रागिनीदेखील न्यायालयीन कोठडीतच आहे.

  • कोर्टाने 25 ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता

न्यायमूर्ती श्रीनिवास हरीश कुमार यांच्या खंडपीठाने या दोघींनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावला. या दोघांवर आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 120 बी आणि एनडीपीएस कायदा 1985 च्या कलम 21, 21 सी, 27 ए, 27 बी आणि 29 यांचा समावेश आहे. यापूर्वी विशेष न्यायालयानेदेखील या दोघींची याचिका 28 सप्टेंबर रोजी फेटाळली होती. 25 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.

  • विवेक ओबेरॉयचा मेहुणा अद्याप फरार आहे

याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आणि कर्नाटकचे माजी मंत्री जीवनराज अल्वा यांचा मुलगा आदित्य हादेखील आरोपी आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांना ड्रग्ज पुरविल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तथापि, तो अद्याप पोलिसांना सापडला नाहीये. अलीकडे याच प्रकरणात विवेकच्या मुंबईच्या घराची झाडाझडती घेण्यात आली होती.