आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत गोंधळाची परिस्थिती:करणी सेनेने भास्करला सांगितले - कंगनाची बहीण रंगोलीच्या सांगण्यावरुन आम्ही करतोय आंदोलन, देशातील कोणत्याही स्त्रीचा अपमान सहन केला जाणार नाही

किरण जैन, मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करणी सेनेने म्हटले, कंगना राजपूत आहे आणि आम्ही कोणत्याही राजपूतचा अपमान सहन करणार नाही.
  • करणी सेनेच्या म्हणण्यानुसार- जर आमची माणसे मुंबईत कमी पडली तर आम्ही देशभरातून आमच्या लोकांना बोलवू.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाच्या विरोधामुळे चर्चेत आलेली करणी सेना ही संघटना अभिनेत्री कंगना रनोटच्या समर्थनार्थ पुढे आली असून त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दैनिक भास्करसोबतच्या खास बातचीतमध्ये करणी सेनेचे महाराष्ट्र शहर अध्यक्ष जीवन सिंह सोलंकी यांनी सांगितले की, त्यांची संघटना सर्व प्रकारच्या आंदोलनासाठी तयार आहे आणि ते कंगनाला मागे हटू देणार नाहीत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत प्रवेश न करण्याची धमकी दिल्याचा आरोप करत कंगनाने मुंबई शहराची तुलना पीओकेशी केली होची. यानंतर सुरू झालेल्या वादानंतर बुधवारी पालिकेने तिच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड केली. आता करणी सेनेने कंगनाच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

  • 'देशातील कोणत्याही महिलेचा अपमान सहन करणार नाही'

दैनिक भास्करसोबत बोलताना जीवन सिंह म्हणाले की, 'शिवसेनेचे लोक ज्या प्रकारे कंगनाचा अपमान करीत आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहे. आपल्या देशातील कोणत्याही महिलेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आम्ही मुंबई गाठली आहे आणि त्यांना (कंगनाला) पूर्ण सुरक्षा देण्याची क्षमता आमच्यात आहे. शिवसेना आणि बीएमसीने एकत्रितपणे कंगना यांचे कार्यालय तोडले हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर आम्हाला याबद्दल आगाऊ माहिती झाले असते, तर त्याच वेळी आम्ही हे आंदोलन सुरू केले असते, तरीही अद्याप उशीर झालेला नाही. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा गैरवर्तन झाले तर आमच्यात देशभर आंदोलन करण्याची क्षमता आहे.'

  • 'कंगनाची बहीण रंगोलीसोबत झाली चर्चा'

जीवन यांनी सांगितले की, ते कंगनाची बहीण रंगोलीच्या सांगण्यावरून हे सर्व करत आहेत. ते म्हणाले, 'मी कंगनाची बहीण रंगोली यांच्याशी बोललो आहे आणि आम्ही त्यांच्या इशा-यावर हे आंदोलन करत आहोत. आंदोलनं अनेक प्रकारची असतात. आम्हाला जे करायचे आहे ते आम्ही करू शकतो. आम्ही करणी सेना आहोत, माघार घेणा-यांपैकी आम्ही नाही. कंगना एक राजपूत आहे आणि आम्ही कोणत्याही राजपूतचा अपमान सहन करणार नाही. जर आमची माणसे मुंबईत कमी पडली तर आम्ही देशभरातून आमच्या सेनेला बोलावून हे आंदोलन मोठे करू. सर्व देशवासियांसह आम्ही देखील कंगनाच्या पाठीशी उभे आहोत.'

जानेवारी 2018 मध्ये करणी सेनेने देशभरात 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात निषेध केला आणि चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांना चित्रपटाचे शीर्षक 'पद्मावती'वरुन 'पद्मावत' करायला भाग पाडले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser