आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फ्रेडी'चा टिझर रिलीज:दिवसा डेंटिस्ट आणि रात्री किलर बनला कार्तिक आर्यन, हटके अंदाजात दिसला

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम, लग्न, विश्वासघात! प्रेमासाठी किंवा सूडासाठी कोण कुठल्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी डिज्नी+ हॉटस्टारने आज त्यांच्या आगामी रोमँटिक थ्रिलर 'फ्रेडी' चा टिझर रिलीज केला. बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड, एनएच स्टुडिओज आणि नॉर्दर्न लाइट्स फिल्म्स निर्मित, शशांक घोष दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन आणि अलाया एफ स्टारर हा चित्रपट 2 डिसेंबर 2022 रोजी डिज्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.

फ्रेडी ही डॉ. फ्रेडी जिनवाला (कार्तिक आर्यन) आणि कैनाज (अलाया एफ) यांची कथा आहे. डॉ. फ्रेडी हा व्यवसायाने डेंटिस्ट असून त्याचा भूतकाळ अत्यंत क्लेशकारक अशा घटनांनी भरलेला आहे. तो एकलकोंडा असून तो त्याच्या मिनीएचर विमानांसोबत रमतो. त्याचा एकमेव मित्र आहे तो म्हणजे त्याचे पाळीव कासव 'हार्डी'. कैनाज ही एक विवाहित स्त्री आहे, जिचा नवरा संशयी आणि अत्याचारी आहे. ती फ्रेडीच्या प्रेमात पडते. फ्रेडीला कैनाजशी लग्न करायचे आहे मात्र त्यातील ट्विस्टमुळे भावनांचा गोंधळ उडतो आणि त्याचे आयुष्य उलथपालथ होऊन जाते.

पाहा टिझर...

फ्रेडी या पात्राबद्दल बोलताना अभिनेता कार्तिक आर्यन म्हणाला, “फ्रेडी ही एक गुंतागुंतीची स्क्रिप्ट आणि पात्र होते, त्या व्यक्तिरेखेला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही तयार करावे लागले. या पात्राने मला माझ्या व्यक्तिरेखेची वेगळी बाजू आणि अभिनेता म्हणून प्रत्येक टप्प्यावर माझी क्षमता शोधण्यासाठी मदत केली. फ्रेडीचा भाग बनून मला आनंद होत असून चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी मी उत्सुक आहे."

अलाया एफ म्हणाली, "फ्रेडीची कथा ऐकताच, मी त्याचा भाग होण्यासाठी होकार दिला. कैनाज हे माझ्यासाठी आव्हानात्मक पात्र होते, मला या पात्रात येण्यासाठी खूप काही शिकावे लागले आणि बऱ्याच गोष्टींचा त्याग देखील करावा लागला. मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. फ्रेडीमुळे मला माझी क्षितिजे रुंदावण्यास मदत झाली. कार्तिक, शशांक सर आणि संपूर्ण टीममुळे हे शक्य झाले."

बातम्या आणखी आहेत...