आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्स्ट लूक पोस्टर आऊट:कार्तिक आणि कियाराचा ‘सत्यनारायण की कथा' चे शीर्षक आता झाले ‘सत्यप्रेम की कथा'

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या आगामी ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचे शीर्षक बदलण्यात आले आहे. कियाराच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकने चित्रपटातील फर्स्ट लूक मोशन फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की, चित्रपटाचे शीर्षक ‘सत्यनारायण की कथा’ वरून बदलून ‘सत्यप्रेम की कथा’ करण्यात आले आहे. कोणताही वाद होऊ नये म्हणून निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा होताच त्याच्या शीर्षकावरून वाद सुरू झाला. अनेकांनी त्याला हिंदुत्वविरोधी म्हटले होते. त्यानंतर निर्मात्यांनी सांगितले की, आम्ही चित्रपटाचे शीर्षक बदलू कारण त्यांना कोणाच्याही भावना दुखावण्याची आमची इच्छा नाही.

व्हायरल झाला लूक
कार्तिक आर्यनने या प्रेमकथा चित्रपटातील कियारासोबतचा फर्स्ट लूक मोशन फोटो शेअर केला आणि लिहिले...“हॅपी बर्थडे कथा. तुझा सत्यप्रेम. ‘सत्यप्रेम की कथा’. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत आणि खूप रोमँटिक दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विध्वंस यांचे तर साजिद नाडियादवाला यांची ही निर्मिती आहे.

बातम्या आणखी आहेत...