आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याची काशी यात्रा:'भूल भुलैया 2'च्या यशानंतर वाराणसीला पोहोचला कार्तिक आर्यन, चित्रपटाने 5 दिवसांत कमावले 76 कोटी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला होता

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाला मिळालेले यश साजरे करत आहे. रिलीजच्या पाच दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 76 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक नुकताच काशी विश्वनाथच्या दर्शनाला पोहोचला. कार्तिकसोबत चित्रपटाचे निर्माते भूषण कुमारही दिसले.

गंगा आरतीत सहभागी झाला कार्तिक
कार्तिकने गंगेच्या दशाश्वमेठ घाटावरील दैनंदिन संध्याकाळच्या आरतीतही भाग घेतला. चाहत्यांची गर्दी रोखणे कठीण झाले असते म्हणून अभिनेत्याला पोलिसांनी आधी आरतीत सहभागी होण्यापासून रोखले होते. मात्र, नंतर त्यांना आरतीला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली.

कार्तिकने शेअर केले बनारसचे फोटो
कार्तिकने गंगा आरती आणि बोटिंग करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'ब्लेस्ड.' फोटोंमध्ये कार्तिक कुर्ता-पायजाम्यात दिसतोय. पोस्टवर प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी लिहिले, "देव तुला खूप आशीर्वाद आणि यश देवो."

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कार्तिक गेला होता सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
'भूल भुलैया 2' रिलीज होण्यापूर्वी कार्तिक श्रीगणेशाचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. कार्तिकने मंदिराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये संस्कृतमध्ये गणपतीचा श्लोकही लिहिला होता. कार्तिक प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजपूर्वी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात आवर्जुन जात असतो.

हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला होता
कार्तिक आर्यनने या चित्रपटात रुहान रंधावा उर्फ ​​रूह बाबाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कार्तिकशिवाय कियारा अडवाणी, तब्बू, संजय मिश्रा आणि राजपाल यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनीस बज्मी दिग्दर्शित हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

चित्रपटाची आतापर्यंतची कमाई

रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर 14.11 कोटी रुपयांची कमाई केली. या वर्षी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांमध्ये या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन सर्वाधिक होते. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी अलीकडेच चित्रपटाचे 5 दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले असून ते 76.27 कोटी रुपये इतके आहे. या वीकेंडला हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...