आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्स्ट लूक:कार्तिक आर्यनची 'धमाका'मधील पहिली झलक, फोटो शेअर करुन म्हणाला - भेटा अर्जुन पाठकला; चित्रपटात साकारणार पत्रकाराची भूमिका

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाची घोषणा कार्तिकने 22 नोव्हेंबर रोजी आपल्या वाढदिवशी केली होती.

अभिनेता कार्तिक आर्यनने सोमवारी आपल्या आगाम 'धमाका' या चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे. या चित्रपटात तो 'अर्जुन पाठक' नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा पत्रकार मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे लाइव्ह कव्हरेज करतो.

कार्तिकने फोटो शेअर करत 'धमाका'च्या अर्जुन पाठकाला भेटा, असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग दिसत आहे. या चित्रपटाची घोषणा कार्तिकने 22 नोव्हेंबर रोजी आपल्या वाढदिवशी केली होती. राम माधवानी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

'भूल भूलैया 2' आणि 'दोस्ताना 2' वर काम करतोय कार्तिक
'धमाका' व्यतिरिक्त कार्तिक आगामी 'भूल भुलैया 2' आणि 'दोस्ताना 2' या आगामी चित्रपटांवरही काम करत आहे. 'लव आज कल' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान दिसली होती. कार्तिकचा हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा पसंत पडला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...